रायगड : एकीकडे मतदान सुरू असतानाच दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील बिरवाडीमध्ये भानामतीचा प्रकार केल्याचं समोर आला आहे. महाडजवळील बिरवाडी शहराच्या नाक्यावर एका रस्त्यावर मधोमध तीन मडकी आणि नारळ रचून ठेवण्यात आल्याचं दिसून आलं. लाल आणि काळ्या फडक्याने मडक्याचं तोंड बंद करून खाली नारळ अशा स्वरूपात हा भानामतीचा प्रकार केल्याचं समोर आला आहे.
बिरवाडी आसनपोई रस्त्यावरील नाक्यावर आगदी मधोमध हा उतारा ठेवण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये काही प्रमाणात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कोणी देवदेवस्की केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.पोलिसांनी हा सगळा प्रकार उधळून लावत ही मडकी फेकून दिली आहेत.
महाडमध्ये दोन शिवसेनेत लढत
महाडमध्ये यंदा शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रतोद आणि एस्टी महामंडळाचे अध्यक्ष असलेले भरत गोगावले आणि ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्यामध्ये लढत होत आहे. या मतदारसंघातून सलग तीन वेळा गोगावले यांनी विजय मिळवला आहे.
महाडमध्ये गाजलेले मुद्दे
एमआयडीसी परिसरातील नागरीकांचे स्थलांतर, माणगाव शहरातील मुंबई गोवा हायवेला पर्यायी बायपास अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या होते. महाड तालुक्यातील काही दरड गरस्त गावांचं पुनर्वसन बाकी आहे.
भरत गोगावले यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी तब्बल 1 लाख 2 हजार 273 मताधिक्य घेतलं होतं. गोगावले यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी आमदार माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप या उभ्या असणार आहेत.
भरत गोगावले यांच्या शिवसेना पक्ष फुटीनंतर स्नेहल जगताप यांनी काँगेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेना ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यामुळे गोगावले यांच्या पूर्वीच्या सेनेतील मतदार राजा आता कोणाला कौल देणार हे पाहणे महत्वाचं राहील. मात्र गोगावले यांनी शिंदे गटाकडून देखील आपल पारडं अद्यापही मजबूत करून ठेवल्याचं दिसत आहे त्यामुळें स्नेहल जगताप या गोगावले यांना कितपत शह देतील हे पाहणे औत्सुक्याचे राहील.
ही बातमी वाचा: