Health: वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावरही तसे बदल दिसून येतात. जस जसं वय वृद्धत्वाकडे वळतं, तसतसं चेहऱ्यावरील तेज कमी होऊन, सुरकुत्या आणि इतर लक्षणं दिसून येतात. मुळात हे असे बदल नैसर्गिक आहेत. पण काही लोकं ते मानायला तयार नसतात. त्यांना आपल्या वाढत्या वयातही तारूण्य असल्याप्रमाणे राहायचं असतात, त्यासाठी ते अनेक उपाय करताना दिसतात. विविध कॉस्मेटिक्स किंवा आयुर्वेदिक, होमिओपथीची औषधांचं सेवन करतात. पण काही वेळेस याचा इतका दुष्परिणाम होतो की त्यांचा चेहरा नेहमीपेक्षा आणखी बिघडतो. आणि मग पश्चाताप करण्याची वेळ येते. अलीकडेच जॉन्सन नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा चेहरा सुजलेला आहे. ज्यात त्याने स्पष्ट म्हटलंय की, हे  Anti-aging प्रयोगामुळे झाले आहे. हे कसं घडलं, तेही त्याने सांगितलंय. जाणून घ्या..


जेव्हा अँटी-एजिंग प्रयोगाने त्याची दृष्टी गेली...


सोशल मीडियावर एक पोस्ट समोर आली आहे, जी बायोहॅकर ब्रायन जॉन्सनने शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी सांगितले की, 'ॲन्टी-एजिंग' उपचार चुकीचे झाल्यानंतर ऍलर्जीमुळे त्यांचा चेहरा कसा विद्रूप झाला. सध्या ब्रायन जॉन्सन 47 वर्षांचा आहे आणि तो 'बेबी फेस' शोधत होता, त्यामुळे त्याने हे अनोखे इंजेक्शन तयार केले. जाणून घेऊया या अनोख्या उपचाराबद्दल.


जॉन्सन करतो विचित्र प्रयोग 


जॉन्सन हा विचित्र प्रयोगांसाठी ओळखला जातो, हे प्रयोग अँटी-एजिंग उपचारांशी संबंधित आहेत. नुकतेच, त्याने अशाच प्रकारचे उपचार घेतले होते, ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर दुसऱ्याची चरबी टोचली होती, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्याचा वरचा भाग सुजला होता. याशिवाय तो डोळ्यांनी पाहू शकत नव्हता. हा प्रयोग त्यांच्या ‘प्रोजेक्ट ब्लू प्रिंट’चा भाग होता.






मृत्यूच्या उंबरठ्यावर...?


जॉन्सनने एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने याबद्दल सांगितले. आणि लिहिले की मी खूप बारीक झालो आहे, आणि फॅट्स देखील कमी झाले. विशेषतः माझ्या चेहऱ्यावर याचे दुष्परिणाम दिसू लागले. अनेकदा वाटले की, मी मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे. जॉन्सनची संपूर्ण पोस्ट काय आहे, ती जाणून घ्या..


Anti-Aging प्रयोगांमुळे होणारी समस्या


जॉन्सनने आपल्या इंस्टाग्रामवर सांगितले की, त्यांच्या टीमला असे आढळले की, तरुण दिसण्यासाठी चेहऱ्यावरील चरबी खूप महत्वाची आहे आणि जर माझ्याकडे चेहऱ्यावरील चरबी नसेल तर माझे बायोमार्कर्स किती चांगले आहेत हे महत्त्वाचे नाही. जॉन्सन म्हणाले की, माझ्या शरीरातील चरबी वाढीस उत्तेजन देऊन व्हॉल्यूम ठेवण्यासाठी त्याने फॅट-डेरिवेटिव एक्स्ट्रा सेल्यूलर मॅट्रिक्सचा  वापर केला, ज्याचा अर्थ फिलर वापरण्याऐवजी चेहऱ्यावर चरबी टोचणे हा होता. यासाठी तुमच्या स्वतःच्या शरीरातील चरबी वापरणे शक्य आहे, परंतु समस्या अशी होती की माझ्या शरीरावर काढण्यासाठी पुरेशी चरबी नव्हती, म्हणून मी दाताचा वापर केला.


30 मिनिटांनंतर चेहऱ्यावर आली सूज


या उपचारानंतर 30 मिनिटांनंतरच त्याची प्रतिक्रिया दिसून आली. जॉन्सन म्हणाला की, इंजेक्शन दिल्यानंतर लगेचच माझ्या चेहऱ्यावर सूज येऊ लागली. आणि मग चेहरा खराब झाला आणि इतका खराब झाला की मी पाहू शकत नाही. ही एक तीव्र एलर्जीची प्रतिक्रिया होती.


हेही वाचा>>


Viral: आई सर्वात मोठी योद्धा! लेकरासाठी एक 'आई' काय करू शकते, 'हा' व्हायरल व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )