एक्स्प्लोर
Advertisement
पार्थ पवार यांची संपत्ती किती? श्रीरंग बारणे किती कोटींचे मालक?
मावळ मतदारसंघात 29 वर्षीय पार्थ पवार आणि 55 वर्षीय श्रीरंग बारणे यांच्यात सामना रंगणार आहे. आज या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा देत अर्ज दाखल केले
पिंपरी चिंचवड : पार्थ पवार यांच्या रुपाने पवार घराण्याची तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा संधी दिली आहे. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी आज या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा देत अर्ज दाखल केले. यावेळी प्रतिज्ञापत्रात पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांनी आपली संपत्ती, शिक्षण, गुन्हेविषयक माहिती जाहीर केली आहे.
मावळ मतदारसंघात 29 वर्षीय पार्थ पवार आणि 55 वर्षीय श्रीरंग बारणे यांच्यात सामना रंगणार आहे. जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून पार्थ पवार यांची एकूण संपत्ती 20.12 कोटी रुपये आहे. या त्यांच्या वारसाप्राप्त मालमत्तेचाही (2.81 कोटी रुपये) समावेश आहे. पार्थ पवार यांच्यावर 9.36 कोटी रुपयांचं कर्ज आहे. विशेष म्हणजे हे कर्ज त्यांनी आई सुनेत्रा आणि भाऊ जय यांच्याकडून घेतलं आहे.
तर पत्नीच्या संपत्तीसह श्रीरंग बारणेही अब्जाधीश आहेत. बारणेंची जंगम मालमत्ता 13.20 कोटी रुपयांची असून स्थावर मालमत्ता सुमारे 69.60 कोटी रुपयांची आहे. यात बारणेंच्या वारसाप्राप्त मालमत्तेचाही (25 कोटी रुपये) समावेश आहे. श्रीरंग 4 लाख रुपयांचं कर्ज आहे. बारणेंनी प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या संपत्तीचाही उल्लेख केला आहे. सरीता श्रीरंग बारणे यांची एकूण संपत्ती 19.51 कोटी रुपयांची आहे.
पार्थ पवार बीकॉम असून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईतील एचआर कॉलेजमध्ये पूर्ण केलं आहे. त्यांचा उत्पन्नाचा स्रोत शेती आणि व्यवसाय आहे. त्यांच्याविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे श्रीरंग बारणे दहावी नापास आहेत. पिंपरी चिंचवडमधील फतेचंद जैन विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. तर त्यांच्याविरोधातील प्रलंबित फौजदारी खटल्यांची संख्या तीन आहे.
पार्थ अजित पवार (वय 29 वर्ष)
जंगम मालमत्ता : 3,69,54,163
वारसाप्राप्त मालमत्तेसह (2,81,35,970) स्थावर मालमत्ता : 16,42,85,170
एकूण संपत्ती : 20,12,39,333
कर्ज 9,36,13,295 (आई सुनेत्रा पवार-7,13,13,295 रुपये आणि भाऊ जय पवार-2,23,00,000 रुपये)
जंगम मालमत्ता
श्रीरंग बारणे : 13,20,88,964 रुपये
सरीता बारणे : 57,05,646 रुपये
स्थावर मालमत्ता (वारसाप्राप्त मालमत्तेसह)
श्रीरंग बारणे : 69,60,57,856 रुपये
सरीता बारणे : 18,94,57,668 रुपये
एकूण संपत्ती : 1,02,33,10,134 रुपये
कर्ज 4,16,612
VIDEO | जोरदार शक्तीप्रदर्शन, पार्थ पवारांचा मावळमधून उमेदवारी अर्ज दाखल
संबंधित बातम्या
पूनम महाजन आणि प्रिया दत्त यांची संपत्ती किती?
आंबेडकर, शिंदे, स्वामी; सोलापुरातील उमेदवारांची मालमत्ता किती?
प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणेंवर किती कर्ज? बीडमधील उमेदवारांच्या संपत्तीचं विवरण
अहमदनगरचे भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांची संपत्ती किती?
सुळे कुटुंब अब्जाधीश, सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे 15 कोटींची संपत्ती, प्रतिज्ञापत्रात दिली माहिती
भाजपचे अब्जाधीश उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर 89 कोटींचं कर्ज
स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टींची संपत्ती पाच वर्षात तिपटीने वाढली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement