Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभेच्या मतदानाला आता अवघे काही तास उरले आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवत राजकीय प्रचाराला रंग चढला असून आता प्रचाराला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्या अनुषंगाने राज्यासह देशातील दिग्गज नेते आपल्या पक्षाचा प्रचारात मैदानात उतरल्याचे चित्रा आहे. असे असताना यंदा महायुती आणि महाविकास आघाडीसह इतर पक्षांनीही आपले उमेदवार मैदानात उतरवत ही लढत अधिक चूरशीची  केली आहे. अशातच महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीशिवाय सरकार बनणार नाही, असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी वर्ध्यातील आर्वीच्या सभेत बोलताना व्यक्त केला आहे.


.... त्या पेक्षा आमच्या गरिबांची पान टपरी बरी!


इतरांप्रमाणे आम्हालाही पक्ष बदलता आले असते, आम्हालाही भाजप आणि काँग्रेस मध्ये जाता आलं असतं,  पण आम्हाला वाटले आमच्या गरिबांची पान टपरी बरी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 122 जागा उभ्या केल्या, त्यात 40 जागा प्रहारच्या आहे. प्रहार पंधरा जागावर दणका ठेवणार आहे. त्यात आर्वीचा समावेश आहे. सरकार ना आमचं बनेल, नाही युतीचे नाही महाविकास आघाडीचे, मात्र  'हम सरकार बनायेंगे' असा इशारा देत बच्चू कडू यांनी भर सभेत विश्वास व्यक्त केला.


अमच्याशिवाय सरकार बसणार नाही- बच्चू कडू 


कोणत्याही पक्षाजवळ बहुमत राहणार नाही, मात्र अमच्याशिवाय सरकार बसणार नाही. असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. आर्वी येथे जयकुमार बेलखडे या प्रहरच्या उमेदवारासाठी आज आर्वी येथे सभा घेण्यात आली. यावेळी बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही 122 जागा उभ्या केल्या, त्यात 40 जागा प्रहारच्या आहे. त्यातल्या त्यात प्रहार पंधरा जागावर दणका ठेवणार आहे. त्यात आर्वीचा समावेश असल्याचेही ते म्हणाले.


आता प्रजेचं राज्य निर्माण करावं लागेल-बच्चू कडू


पक्ष मोठा नाही तर कार्यकर्ता हा पक्षाला मोठा करतो, अनेक गोष्टी धर्म आणि जातीच्या नावावर पेटविल्या जातात. मात्र मित्रहो हे नामर्दांची औलाद आहे, हे धर्म आणि जातीशिवाय निवडून येत नाही. पन्नास वर्षे काँग्रेस, तर पंधरा वर्षे भाजप सत्तेत राहिली, महाराष्ट्रात काय बदल झाला. आजही तलाठी छाती ठोक आमच्यासमोर उभा असतो. प्रजेचं राज्य नाही तर  कर्मचारी, अधिकारी आणि नेत्यांचं राज्य आहे. आमचं राज्य संपलं आता प्रजेचं राज्य निर्माण करावं लागतंय, असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले  


 


हे ही वाचा