अकोला : सध्याच्या राजकीय गरमागरमीत हलकेफुलके क्षण फारच कमी वेळा अनुभवायला मिळतात. असाच अनुभव आला आहे तो आमदार बच्चू कडू यांच्या संदर्भात. आमदार बच्चू कडू ओळखले जातात ते त्यांच्या मिश्कील आणि मोकळ्या ढाकळ्या स्वभावासाठी. महिला कार्यकर्त्यांनी 'बच्चूभाऊ तूम आगे बढो' असं म्हणतात आणखी आगे बढलो तर खाली पडेन असं बच्चू कडू म्हणाले. त्यावेळी लोकांमध्ये हास्याचा फवारा उडाला. 


आमदार  बच्चू कडू हे  मंगळवारी अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर मतदारसंघातल्या बार्शीटाकळी येथील प्रचार सभेत बोलत होते. ते मूर्तिजापूरचे उमेदवार रवी राठोड यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. यावेळी बच्चू कडू यांचे भाषण सुरू असताना व्यासपीठावरील महिला कार्यकर्तीने मध्येच 'बच्चूभाऊ तूम आगे बढो' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्याचवेळी हजरजबाबी पणे बच्चू कडूंनी महिला कार्यकर्तीला उद्देशून "अगं माऊले!, मी आणखी आगे बढलो तर खाली पडेन" असं मिश्किल उत्तर दिलंय. 


टाळ्या वाजवणाऱ्यांना सुनावलं


दरम्यान, सोयाबीनला 7 हजार भाव जाहीर करून 5 हजार रुपये सरकारने भाव दिला असं बच्चू कडू म्हणाले. त्यावर काही लोकांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवणाऱ्या लोकांनाही बच्चू कडू यांनी चांगलं सुनावलं. आपल्यालाही खरंच लाज कशी वाटत नाही असा संतप्त सवाल त्यांनी केला. काँग्रेसने कायम मुस्लिमांचा वापर केल्यानंतरही मुस्लिम काँग्रेसला का मतदान करतात? असा सवालही त्यांनी मुस्लिम समाजाला विचारला.


ही बातमी वाचा: