Leo Weekly Horoscope 18 To 24 November 2024 : नवीन आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा फार खास असणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सिंह राशीसाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह राशीची लव्ह लाईफ (Leo Love Horoscope)
तुमच्या जोडीदारावर खूप प्रेम करा आणि तुम्ही दोघं एकत्रित जास्त वेळ घालवाल याची खात्री करा. या आठवड्यात अशी निरुपयोगी संभाषणं टाळा, ज्यामुळे तुमच्या प्रियकराच्या भावना दुखावतील. वाद घालतानाही सावध राहा. प्रेमप्रकरण फलदायी ठेवण्यासाठी प्रियकराच्या मताला महत्त्व द्यावं. अविवाहित लोकांना अशी एखादी व्यक्ती भेटेल, जिच्यासोबत त्यांना त्यांचं लाईफ शेअर करायला आवडेल.
सिंह राशीचे करिअर (Leo Career Horoscope)
ज्या लोकांची नुकतीच नवीन कंपनीत नियुक्ती झाली आहे, त्यांनी टीम मीटिंगमध्ये आपली मतं मांडताना काळजी घ्यावी. आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी कठीण जाईल. विशेषतः कोणताही नवीन प्रकल्प सुरू करताना व्यावसायिकांनी यावेळी विशेष काळजी घेतली पाहिजे. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस व्यावसायिकांसाठी थोडे कठीण आहेत आणि त्यांना थोडी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. नवीन करार किंवा नवीन प्रकल्पावर स्वाक्षरी करताना तुम्ही विशेष काळजी घ्यावी. टेक्सटाईल, बांधकाम, आर्थिक व्यवहार करणाऱ्या लोकांना आज चांगलं उत्पन्न मिळेल.
सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)
या आठवड्यात आर्थिक बाबी तुम्हाला त्रास देणार नाहीत. मोठ्या गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचा हा आठवडा आहे. तुम्ही सोनं किंवा हिरे देखील खरेदी करू शकता, याशिवाय तुम्ही कार खरेदीची योजना देखील अंमलात आणू शकता. तुमच्या मुलाला परदेशात पाठवण्यासाठी तुम्हाला शिकवणी फी भरावी लागेल.
सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope)
या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांना कार्यालयीन जीवनात समतोल साधावा लागेल. जर तुमच्या जीवनात तणाव असेल तर योगासनं करा, यामुळे तुम्ही शांत राहाल. वृद्ध लोकांना झोपेशी संबंधित समस्या असतील, म्हणून तुम्ही पारंपारिक उपायांचा अवलंब करावा. महिलांनी स्वयंपाकघरात भाजी कापताना काळजी घ्यावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :