एक्स्प्लोर

बाळासाहेबांच्या अटकेचा प्रश्न मिटलाय, फोकस बदलण्याचं कारण नाही : छगन भुजबळ

काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अटक ही मोठी चूक होती असा कबुलीनामा अजित पवार तोंडी परीक्षा कार्यक्रमात दिला होता.

अहमदनगर : "बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेचा प्रश्न मिटला आहे. आज ईडी याच्या-त्याच्या डोक्यावर बसलीय, तो प्रश्न असताना फोकस बदलण्याचं कारण नाही," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना लगावला आहे. राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आली होती, असा खळबळजनक खुलासा अजित पवार यांनी एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' कार्यक्रमात केला होता. काय म्हणाले होते अजित पवार? काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अटक ही मोठी चूक होती असा कबुलीनामा अजित पवार तोंडी परीक्षा कार्यक्रमात दिला होता. ते म्हणाले होते की, "त्या काळात माझं मत होतं की इतक्या टोकाचं राजकारण करु नये. मात्र त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. काही जणांच्या हट्टापायी त्यांना अटक करण्यात आली. वास्तविक कुणाच्याही बाबतीत असं करु नये, असे अजित पवार म्हणाले. आम्ही यावर आक्षेप घेतला असता 'आम्ही त्या विभागाचे प्रमुख आहोत, आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करणार आहोत', असं म्हटलं गेलं. यावेळी अजित पवार यांचा रोख तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे होता. बाळासाहेब ठाकरेंना अटक केली ते चुकलंच, अजित पवारांची कबुली बाळासाहेबांच्या फाईलवर सही करताना भुजबळांनी विचार करायचा होता : मुनगंटीवार फोकस बदलायचं कारण नाही : भुजबळ याविषयी विचारला असता छगन भुजबळ यांनी अजित पवारांना फोकस न बदलण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, "फोकस कशाला चेंज करता? ईडी नको त्या लोकांना अटक करतेय त्याच्यावर फोकस असताना, असा फोकस वळवण्याचा प्रयत्न करु नका. बाळासाहेबांना अटक झाली, ती केस मीच काढली. बाळासाहेबांच्या कुटुंबासह भुजबळ कुटुंबीयांनी जेवणही केलं. तो प्रश्न कधीच सुटलेला आहे, आज प्रश्न ईडी याच्या-त्याच्या डोक्यावर बसलीय, तो प्रश्न आहे, फोकस बदलायचं कारण नाही." बाळासाहेबांना अटक का? बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत दंगली उसळल्या होत्या. या दंगलीच्या तपासासाठी जस्टीस श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाच्या शिफारशीनुसारच आपण कारवाई केली, असं भुजबळ म्हणाले. एका अग्रलेखाच्या प्रकरणावरुन 2000 साली बाळासाहेबांना अटक करण्यात आली होती. 'माझा कट्टा'वर भुजबळ काय म्हणाले होते? ''गृहमंत्री झाल्यानंतर सगळ्या फाईल पुढे गेलेल्या होत्या. मात्र नेमकी बाळासाहेबांच्या अटकेचीच फाईल माझ्यासमोर आली. पोलिसांनी सांगितलं यावर कारवाई करायला पाहिजे. त्यानंतर त्या फाईलवर फक्त सही केली, ती फाईल माझ्या कार्यकाळात तयार झाली नव्हती,'' असं भुजबळ म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
Gokul Election : सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget