एक्स्प्लोर

NMC Standing Committee : नाशिक स्थायी समिती सभापतीपदासाठी सस्पेन्स कायम, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही भाजपचा उमेदवार अद्याप ठरेना; कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

NMC Standing Committee : नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे.

NMC Standing Committee : नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी (Standing Committee Chairman Election) राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचा (BJP) उमेदवार कोण असेल याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असतानाही पक्षाकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे शहराच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक 25 फेब्रुवारीला होणार आहे. आज (23 फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने दिवसभर राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

BJP : भाजपमध्ये लॉबिंग जोरात

सभापतीपदासाठी भाजपकडून अनेक नावांची चर्चा सुरू आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. महापौर-उपमहापौर निवडणुकीवेळी भाजपने ऐनवेळी शिवसेनेसह युती केल्याने सानप यांना उपमहापौर पदाची उमेदवारी मागे घ्यावी लागली होती. त्यामुळे आता त्यांना स्थायी समिती सभापतीपदाची संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याशिवाय महापौर पदाच्या शर्यतीत शेवटपर्यंत राहिलेल्या दीपाली कुलकर्णी आणि माधुरी बोलकर यांनीही सभापतीपदासाठी लॉबिंग सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे अंतिम क्षणी कोणाच्या नावावर पक्षाची मोहर उमटते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shiv Sena: शिवसेना अर्ज दाखल करणार का?

महापालिकेच्या सत्तेत भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी आहेत. त्यामुळे उपमहापौर पदाप्रमाणेच शिवसेना स्थायी समिती सभापतीपदासाठी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करणार का, याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप याबाबत स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही.

NMC Standing Committee : स्थायी समितीवर भाजपचे वर्चस्व

महापालिकेच्या स्थायी समितीवर एकूण 16 सदस्य आहेत.

त्यापैकी 9 सदस्य भाजपचे आहेत.

4 सदस्य शिवसेना (शिंदे गट)

1 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस

तर 2 सदस्य शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचे आहेत.

बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा भाजपकडेच असल्याने सभापतीपद भाजपकडेच जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

BJP : भाजपची सावध रणनीती

महापौर व उपमहापौर निवडणुकीवेळी फोडाफोडीची शक्यता लक्षात घेऊन भाजपने आपल्या सर्व नगरसेवकांना शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले होते. निवडणुकीच्या दिवशीच त्यांना महापालिकेत आणण्यात आले होते. त्याच धर्तीवर या निवडणुकीतही खबरदारी घेतली जाणार असल्याचे समजते. सोमवारी सकाळी भाजपकडून उमेदवाराची घोषणा होणार असून त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल. त्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून भाजपचे 9 सदस्य सहलीवर पाठवण्याची तयारी असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनाही पाठवले जाऊ शकते.

NMC Standing Committee : 25 फेब्रुवारीला मतदान

या निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभागृहात विशेष बैठक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी कोणाचे नाव पुढे येते आणि शिवसेना स्वतंत्र अर्ज दाखल करते का, याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

BMC Swikrut Nagarsevak : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन स्वीकृत नगरसेवक ठरले, नाराज आमदाराच्या मुलाला लागली लॉटरी

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Embed widget