एक्स्प्लोर

BMC Swikrut Nagarsevak : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन स्वीकृत नगरसेवक ठरले, नाराज आमदाराच्या मुलाला लागली लॉटरी

स्वीकृत नगरसेवकांच्या दोन जागांसाठी सुरू असलेल्या या लॉबिंगमुळे शिवसेनेत अंतर्गत हालचालींना वेग आला होता. अखेर राज सुर्वे आणि बाळकृष्ण ब्रीद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती

BMC Swikrut Nagarsevak: मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना आघाडीचा महापौर बसल्यानंतर विविध समित्या आणि स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु झाले होते. स्वीकृत नगरसेवक (Swikrut Nagarsevak) म्हणून आपल्याला संधी मिळावी, यासाठी अनेकांनी पडद्यामागून प्रयत्न सुरु केले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) मुंबईत 29 नगरसेवक निवडून आले आहेत. या संख्याबळानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवकपदं येणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी दोन नावे निश्चित करण्यात आली आहेत. (Mumbai Mahangarpalika Election 2026)

हे दोन्ही स्वीकृत नगरसेवक मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु आहे. यामध्ये  माजी नगरसेवक बालकृष्ण ब्रीद आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांचा समावेश असल्याचे समजते. पालिकेच्या निवडणुकीवेळी पक्षाने बाळकृष्ण ब्रीद यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र कागदपत्रांच्या त्रुटींमुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही. त्यावेळी त्यांनी पक्षाने दिलेला एबी फॉर्म अपक्ष उमेदवाराला दिला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. ही शक्यता खरी ठरली आहे.

प्रकाश सुर्वे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या मुलाला मागाठाणे परिसरातून उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. मात्र, याठिकाणी भाजप आणि शिवसेनेत प्रचंड रस्सीखेच असल्याने प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला तिकीट नाकारण्यात आले होते. यामुळे प्रकाश सुर्वे नाराज झाल्याची चर्चा होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांचा मुलगा राज सुर्वे याला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

याशिवाय, मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समित्यांपैकी बेस्ट आणि सुधार या दोन समित्यांचे अध्यक्षपद शिंदेंच्या शिवसेना पक्षाला देण्यात आले आहे. सुधार समितीसाठी मागाठाणेमधील नगरसेविका संध्या दोषी यांना, तर बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी वडाळामधील नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांना संधी देण्यात आली आहे. आज या दोन्ही समितीच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. सुधार आणि बेस्ट समितीचे अध्यक्षांची ही आज बिनविरोध निवड करण्यात येईल. मुंबई महापालिकेतील महापौर पदासह चारही समित्यांच्या अध्यक्षांची निवड ही बिनविरोध झाली आहे.

BMC Election Result 2026: मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे 89 आणि शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत तर मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसचे 24 नगरसेवक, एमआयएमचे 8 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आणि समाजवादी पक्षाचे 2 नगरसेवक यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झाले आहेत. 

आणखी वाचा

स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग, एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पराभूत नगरसेवकांच्या घिरट्या; 'या' दोन नावांची जोरदार चर्चा

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Amol Mitkari : अजित पवारांच्या विमानातील क्रू मेंबर पिंकी मालीच्या आईची अमोल मिटकरींनी घेतली भेट; नेमकं कारण काय?
अजित पवारांच्या विमानातील क्रू मेंबर पिंकी मालीच्या आईची अमोल मिटकरींनी घेतली भेट; नेमकं कारण काय?
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget