एक्स्प्लोर

शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाताना नारायण राणेंच्या डोळ्यात अश्रू होते : नितीन गडकरी

राणेंच्या स्वभावात आणि माझ्यात एक साम्य आहे. आम्हाला छल कपट जमत नाही. आम्ही दोघे स्ट्रेट फॉरवर्ड आहोत. या पुस्तकाच्या पलीकडे राणे साहेबांचे व्यक्तिमत्व आहे आणि त्याचा मी साक्षीदार आहे.

मुंबई : जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मी त्यांच्यावर रागावलो होतो.  मी त्यांना सांगितलं हे करू नका.  ह्यात तुमचं, महाराष्ट्राचं आणि आपल्या विचाराचे नुकसान आहे. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. 'मी हा निर्णय आनंदाने घेत नाही', असं देखील राणे म्हणाले होते. माझ्या हृदयात माझे नेते म्हणून दोन नेत्यांचे स्थान आहे मुंडे साहेब आणि राणे साहेब, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नारायण राणे यांची स्तुती केली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आत्मकथनपर पुस्तकाचे आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रकाशन करण्यात आले. इंग्रजी पुस्तक 'नो होल्ड्स बार्ड' आणि 'झंझावात' या मराठी आवृत्तीचे प्रकाशन नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले. गडकरी यावेळी म्हणाले की, राणे साहेबांच्या जीवनात त्यांनी छलकपट कधी केले नाही. ते काँग्रेसमध्ये गेले नसते तर आज राजकारणाचं वेगळं चित्र असतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं.  तुम्ही असाच संघर्ष करत राहा, आपण एकमेकांचा हात पकडला आहे. तुम्ही कोणत्याही पक्षात जा. असं होणार नाही, पण तरीही आपण एकत्र राहू, असेही गडकरी म्हणाले. पुस्तकात 25 टक्के इतिहास आला आहे, 75 टक्के इतिहास आम्हाला माहिती आहे. पण कदाचित तो समोर मांडता येणार नाही, असेही गडकरी म्हणाले.  झंझावात हा शब्द राणेंच्या नेतृत्वाला साजेसा आहे. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्याने मेरिट मिळवलं की चर्चेचा विषय होतो. त्याप्रमाणे राणे यांचे आयुष्य आहे. राणेंच्या स्वभावात आणि माझ्यात एक साम्य आहे. आम्हाला छल कपट जमत नाही. आम्ही दोघे स्ट्रेट फॉरवर्ड आहोत. या पुस्तकाच्या पलीकडे राणे साहेबांचे व्यक्तिमत्व आहे आणि त्याचा मी साक्षीदार आहे. राजकारणात पद नसताना मैत्री कमी होते. पण माझी आणि राणेंची मैत्री कायम राहिली, असेही गडकरी म्हणाले. राणेंनी दोनपैकी एक 'चिठ्ठी' उचलून काँग्रेस प्रवेश : शरद पवार नारायण राणे मुख्यमंत्री झाले पण कार्यकाळ कमी मिळाला, त्यांना जर पूर्ण कार्यकाळ मिळाला असता तर महाराष्ट्राला कर्तृत्ववान मुख्यमंत्री मिळाला असता.  राणे यांना शिवसेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. अन्याय सहन करायचा नाही, हा त्यांचा स्वभाव त्यांना शिवसेनेत स्वस्थ बसू देत नव्हता. या घालमेलीतून त्यांनी शिवसेना सोडली. मात्र त्यानंतर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यापैकी कोणत्या पक्षात जावं? असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मग त्यांनी दोन चिठ्ठ्या बनवल्या. एक राष्ट्रवादी आणि दुसरी  काँग्रेसची. त्यातली एक चिठ्ठी उचलली, ती काँग्रेसची होती. आता ही चूक होती की घोडचूक? हे मी बोलणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात रंगत आणली.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget