एक्स्प्लोर

ज्यांनी स्वतः कधी घर चालवलं नाही ते माझ्या घराबद्दल बोलतायत, शरद पवारांची मोदींवर टीका

स्वतःला देव म्हणणारे भगव्याचं भांडवल करत आहेत, अशी टीका त्यांनी भाजप उमेदवार डॉ. जय सिद्धेवर स्वामी यांच्यावर केली. महाराज दक्षिणा घ्या, मठात बसा, राजकारण करू नका, असा टोलाही त्यांनी लगावला.

सोलापूर : काही लोक माझ्यावर टीका करतात, माझ्या घरात ऐक्य नाही. माझ्या घरात काय चालतं हे मला कळत नाही मात्र दिल्लीत बसून मोदींना कळतंय. ज्यांनी स्वतः कधी घर चालवलं नाही ते माझ्या घराबद्दल बोलत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केली. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.  वर्ध्यातील प्रचार सभेत भाषण करताना पंतप्रधान मोदींनी पवार कुटुंबावर सडकून टीका केली होती. "राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृहयुद्ध सुरु आहे. शरद पवारांची पक्षावरील पकड सैल होत असून पुतणे अजित पवार पक्षाचा ताबा घेत आहेत," असं मोदी म्हणाले होते. त्याला उत्तर देताना पवार यांनी मोदींवर कडाडून टीका केली. शरद पवार यावेळी म्हणाले की, सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे मोदींनी दाखवलं.  मोदींनी नोटबंदी केली, संपूर्ण देश लाईनमध्ये उभा राहिला, 100 लोकं गेली, 15 लाख नोकऱ्या फक्त नोटबंदीमुळे गेल्या. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं काळा पैसा संपवतो, 2 करोड नोकऱ्या देतो, मात्र एक नोकरी दिली नाही, उलट असलेल्या नोकऱ्या या निर्णयामुळे गेल्या, असेही पवार म्हणाले. शेवटी, रिझर्व्ह बँकेने सांगितले नोटबंदीचा निर्णय चुकला. आम्ही सांगितलं होतं ऐकलं नाही, हा माणूस कोणाचंच ऐकत नाही, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना पवार म्हणाले की, मी सोलापूरचा खासदार कोण? शोधण्याचा प्रयत्न केला. ते दिल्लीतही सापडले नाहीत. कर्तृत्ववान प्रतिनिधीला तुम्ही संधी दिली नाही. चुका होतात मात्र आता चूक सुधारून सुशीलकुमार शिंदेंना पुन्हा निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. कुठलाही साधू हात पसरवू शकत नाही, मत मागणारा साधू कसा. स्वतःला देव म्हणणारे भगव्याचं भांडवल करत आहेत, अशी टीका त्यांनी भाजप उमेदवार डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी यांच्यावर केली. महाराज दक्षिणा घ्या, मठात बसा, राजकारण करू नका, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोला अशी चिठ्ठी आली असता ज्यांचं सोलापुरात काही योगदान नाही त्यांच्यावर शब्द का खर्च करू, असे म्हणत शरद पवारांनी त्यांच्यावर बोलणे टाळले.

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
Embed widget