Airoli Vidhan Sabha Election 2024 : ऐरोली विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचं वर्चस्व कायम असून गणेश नाईक यांनी विजय मिळवला आहे. 2009 आणि 2014 मध्ये इथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. पण, 2019 मध्ये इथे भाजपने सत्ता काबीज केली. भाजपने सलग दुसऱ्यांदा गणेश नाईक यांना तिकिट दिलं आणि त्यांनी गड कायम राखला. सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले गणेश नाईक यांना दणदणीत विजय मिळवला आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे गणेश नाईक विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे एम.के.मढवी अशा लढत पाहायला मिळाली. यांच्याविरोधात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम आणि अपक्ष उमेदवार विजय चौगुले हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
ऐरोली विधानसभा मतदारसंघातील 2024 चा निकाल
- गणेश नाईक - भाजप, विजयी
- एम.के.मढवी - शिवसेना ठाकरे
- विजय चौगुले - अपक्ष
- अंकुश कदम - महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
मतदारसंघाचा इतिहास
ऐरोली विधानसभा मतदारसंघातून 2009 आणि 2014 मध्ये संदीप गणेश नाईक यांना जनतेने विजयी केलं होतं. दोन्ही वेळा संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. संदीप नाईक यांनी शिवसेना उमेदवार विजय चौघुले यांचा पराभव केला होता. पण, 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपने बाजी मारली होती. भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता.
मतदारसंघा कसा आहे?
ऐरोली मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. कळवा आणि ठाणे जवळच्या असलेल्या या मतदारसंघात दलित, मुस्लिम, पाटील आणि यादव या मतदारवर्ग मोठा आहे. 2019च्या आकडेवारीनुसार, ऐरोली मतदारसंघात एकूण 4 लाख 47 हजार 697 मतदार आहेत. यातील 42 हजार 531 दलित, 26 हजार 861 मुस्लिम, 17 हजाराहून अधिक पाटील आणि साडेबारा हजार यादव मतदार आहेत. त्याशिवाय 9 हजाराच्या आसपास राजपूत आणि 8 हजाराच्या जवळपास आदिवासी मतदार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mumbra-Kalwa Assembly Constituency Election 2024 : मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ : मतदार पुन्हा जितेंद्र आव्हाड यांना कौल देणार की नजीब मुल्ला बाजी मारणार?