Uddhav Thackeray, मुंबई : "आम्ही वचन देतोय, त्याला काही पार्श्वभूमी आहे. मी माझ्या आजोबांकडून ऐकायचो. बाळासाहेबांनी देखील मला सांगितलं की, दोघांनाही शाळेची फी भरायला पैसे नव्हते. सातवीत असताना माझ्या वडिलांना आणि आजोबांना देखील शाळा सोडावी लागली. आज देखील अशी अनेक मुलं आहेत, ज्यांना शिकावं वाटतंय. घरी फी भरायला पैसे नाहीत, म्हणून शाळेत जाऊ शकत नाहीत. मधल्या काळात टिव्हीवर एक बातमी पाहिली. एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि मुलाला शाळा सोडावी लागली. कारण डोक्यावर आणि घरावर कर्ज होतं. त्यामुळेच आपण वचन दिलं आहे, मुलींप्रमाणे महाराष्ट्रातील मुलांनाही मोफत शिक्षण देणार", असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत सभेत बोलत होते. 


उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र द्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता जिंकणार हे ठरवणारी निवडणूक आहे. मी तुम्हाला सांगायला आलो आहे की, या सरकारला मुंबईचा जीडीपी वाढवायच आहे. आता नखे वाढतात जटा वाढतात जिडीपी कसा वाढवतात हे माहिती नाही. नीती आयोगाने काही सूचना केल्या आहेत. मुंबई केंद्रशासित करता येत नाही. तोडता येत नाही म्हणून मुंबई महापालिका विसर्जित केली आणि त्यांच्या मित्रांकडून मुंबई ओरबाडण सुरू आहे. देवेंद्र फडणवीस मुंबईवर घाला घातला तर बटेंगे फटेंगे नहीं आपको काटेंगे. त्यांना बटेंगेची भाषा वापरावी लागते. मोदी पंतप्रधान असताना हे व्हावं मला वाटतं मोदी यांनी राजीनामा द्यावा. आपल्याला मी शिवसेना कसं काम करते हे दाखवतो.


मोदीजी तुम्ही हारलेला आहात कारण आता तुमच्याकडे चेहरा नाही. देवाभाऊ जॅकेट भाऊ आणि देवा भाऊ तुम्ही लाडकी बहीण म्हणून अनेक जाहिराती केल्या. ते पैसे वापरले त्यावर एक योजना तयार झाली असती. राज्यात महिला सुरक्षित नाही. मात्र यांच्या चमच्यांना देखील संरक्षण आहे. आपल्याला अंधार संपायचं असेल तर धगधगती मशाल आपल्याला हातात घ्यावी लागेल. 


यांना आई मेली तरी चालेल यांना फक्त खुर्ची हवी आहे. बाकी यांना कशाशी घेणं देण नाही. सगळ्या पक्षांच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे यांचा अभिमान आहे. मात्र मोदिनी मुळे मतं मिळतात हे खोटं ठरलं आहे त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावावा लागतोय. आता बाळासाहेबांचा फोटो लावून मतांची भीक मागत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Sanjay Raut : 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर 20 तारखेला काळजीपूर्वक मतदान करा : संजय राऊत