The Sabarmati Report : 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर समोर आल्यानंतर प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला असून त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा अभिनय याला प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळत आहे. आता या चित्रपटावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. द साबरमती रिपोर्ट चित्रपटावर पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली असून ती सध्या व्हायरल होत आहे.


'द साबरमती रिपोर्ट' वर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया


गोधरा-कांडवर आधारित द साबरमती रिपोर्ट चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चित्रपटाचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाच्या निर्मात्यांचे कौतुक केल आहे. त्यांनी म्हटलंय, निर्मात्यांनी या चित्रपटाद्वारे 'बनावट कथा' दूर करण्यात मदत केली आहे. पंतप्रधानांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या निर्मात्यांचं कौतुक केलं आहे आणि त्यांनी सत्य समोर आणण्याचं काम केल्य़ाचं सांगितलं आहे.


'साबरमती रिपोर्ट'चं पंतप्रधानांकडून कौतुक


आलोक भट्ट यांनी 'X' वर शेअर केलेले ट्वीट रिपोस्ट करून पंतप्रधान मोदींनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. आलोक भट्ट यांनी त्यांच्या पोस्टमध्ये 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचं कौतुक केलं. त्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, पंतप्रधानांनी लिहिले, "एकदम बरोबर".
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स मिडिया अकाऊंटवर पोस्टमध्ये लिहिलंय की, "छान सांगितलं आहे. हे सत्य बाहेर येत आहे, हे चांगलेच आहे, आणि तेही एका प्रकारे सर्वसामान्यांना दिसेल. बनावट कथा केवळ मर्यादित कालावधीसाठी टिकू शकते. अखेरीस, तथ्य नेहमी बाहेर येईल!"


'द साबरमती रिपोर्ट'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद


धीरज सरना दिग्दर्शित 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. विक्रांत मेस्सी याच्यासोबत राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर, अमूल व्ही मोहन आणि अंशुल मोहन यांनी केली आहे.


पंतप्रधान मोदींचं ट्वीट






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pushpa 2 Trailer : पुष्पा नाम नहीं ब्रँड हैं... फ्लावर नही वाईल्ड फायर... पुष्पा 2 चा धमाकेदार ट्रेलर आऊट