Nashik Lok Sabha Election: नाशिकमधील (Nashik Lok Sabha Election) मेहुणे गावातील ग्रामस्थांनी सोमवारी लोकसभेच्या निवडणुकीतील (Lok Sabha Election) मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घातला आहे. गावकऱ्यांनी मतदानावर सामुहिक बहिष्कार टाकला आहे. या मतदान केंद्रावर अद्याप एकही मतदान झाले नाही. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ होत आहे. अधिकारी वर्ग नाराज ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन देऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
मेहुणे गावाचा लोकसभा निवडणूक मतदानावर गावकऱ्यांनी पूर्णपणे बहिष्कार घातला आहे. मेहुणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 53, 54 आणि 55 या मतदान केंद्रावर अद्याप एकही मतदान नाही. गावकऱ्यांनी मतदानावर सामुहिक बहिष्कार घातला आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघातील मालेगाव तालुक्यातील मेहुणे गाव आहे. सकाळी सात वाजल्यापासून एकही मतदान झाले नाही. तीनही मतदान केंद्रावर एकूण 2757 मतदार संख्या आहे. विशेष म्हणजे उमेदवारांचे बूथ प्रतिनिधीही मतदान केंद्रावर झाले नाही. पाणी प्रश्न, शेतकरी समस्या, गावाला दुष्काळी नुकसान भरपाईचे अनुदान मिळाले नाही म्हणून बहिष्कार टाकले आहे.
एकही मतदार मतदान केंद्रावर फिरकला नाही
गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मतदानावर बहिष्कार घातला आहे.दुष्काळी नुकसान भरपाईचे अनुदान, पाणी प्रश्न या सुविधा आम्हाला मिळाल्या नसून प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे आम्ही मागणी केली असता आमच्या समस्यावर तोडगा निघालेला नाही. जोपर्यंत आमच्या समस्या निकाली निघत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. दिंडोरीत मतदानाचे उत्साह असताना शेजारच्या मालेगावातील मेहुणे गावात मात्र एकही मतदार मतदान केंद्रावर फिरकला नाही.
कांद्याच्या माळा घालत शेतकरी मतदानाला
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही तरुण शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाण्याचा प्रयत्न केला.या तरुणांना मतदान केंद्राचे गेटवरवरच पोलिसांनी अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले असता पोलिसांबरोबर त्याची शाब्दिक चकमक झाली.अखेर गळ्यातील माळा काढून ठेवत मतदानाला गेले.
नाशिक लोकसभा मतदार संघासाठी मतदानाला सुरुवात
नाशिक लोकसभा मतदार संघासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक मतदान केंद्रावर मतदारच्या मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. मतदान संथ गतीने सुरू असून मतदान केंद्रावर सुविधा मिळत नसल्याची मतदारांनी संताप व्यक्त केला आहे.
हे ही वाचा :