नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातील (Nashik Lok Sabha Election) अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर (Shantigiri Maharaj)  गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मतदानानंतर ईव्हीएमला (EVM)  हार घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वरमधील  कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर  हा प्रकार घडला होता. शांतीगिरी महाराजांनी मतदान केल्यानंतर एटीव्हीएम मशीनला  हार घातला होता.


नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी त्रम्बकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रवर मतदान केले. मतदान केल्यानंतर शांतिगिरी महाराजाने आपल्या गळ्यातील ईव्हीएम मशीनला घातला. आम्ही सर्व गोष्टींमध्ये देव बघतो, ईव्हीएममध्ये पण देव आहे, असे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले. त्या आधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पुजा करून वंदन केले हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र  मतदान केंद्र हे पवित्र ठिकाण असून आम्ही शुद्ध भावनेतून पूजा केल्याचे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले.


वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातील घटनेची  माहिती  मागवली


शांतीगिरी महाराजांनी सकाळी सात वाजता मतदान केले. मतदान केल्यानंतर मतदान अधिकाऱ्यांनी त्यांच्या बोटाला शाई लावली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. कुठेतरी हा आदर्श आचार संहितेचा उल्लंघन असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्र्यंबकेश्वरमधील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रवर  हा प्रकार घडला आहे.  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातील  घटनेची माहिती  मागवली आहे.


त्र्यंबकेश्वरांने मला आशीर्वाद दिले आहेत त्यामुळे माझा विजय निश्चित : शांतिगिरी महाराज


नाशिक लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी आज आपल्या दिवसाची सुरवात त्र्यंबकेश्वर  ज्योतिर्लिंगाच्या अभिषेकाने केली आहे. त्र्यंबकेश्वर  येथे अभिषेक झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरांने मला आशीर्वाद दिले आहेत त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असे मत नाशिक लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार शांती गिरी महाराज यांनी व्यक्त केले.


नाशिक लोकसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष


आज शेवटच्या टप्प्यासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडतेय. नाशिकमध्येही उमेदवारांनी मतदान करण्यापूर्वी देवाचा आशिर्वाद घेऊन मतदानासाठी रवाना झालेत. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. तर दुसरीकडे मविआचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी देवाचा आशिर्वाद घेऊन मतदान करण्यासाठी रवाना झालेत. नाशिक लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन अभिषेक करत मतदानासाठी रवाना झालेत.


Video :



हे ही वाचा :


Lok Sabha Election 2024 : एक नाही, दोन नाही तर तरुणाचं तब्बल आठ वेळा मतदान; व्हायरल व्हिडीओनं देशभरात खळबळ, पाहा VIDEO