Prashant Damle : मुंबईत आता सगळीकडे मतदानाचा (Lok Sabhe Election 2024) उत्साह दिसून येत आहे. सर्वसामान्यांसह बॉलिवूडचे सेलिब्रिटीदेखील मकदानाचा हक्क बजावत आहेत. त्यातच आता अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी ही आपला मतदानाचा हक्का बजावला आहे. मुंबई (Mumbai) ही अर्थिक राजधानी आहे आणि म्हणून आपण मतदानात ही नंबर 1 राहिलो पाहिजे असं मत प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी व्यक्त केलं आहे.


प्रशांत दामले म्हणाले,"मतदान करण्याचा मला खूप उत्साह असतो. पाच वर्षातून एकदा मतदान करायला मिळतं. म्हणजे वर्षातून एकदा दिवळी येते. पण मतदानाचा हक्क पाच वर्षातून एकदा बजावता येतो. सर्वांनीच मतदान करायला हवं. मीदेखील मतदान केलं आहे. कालपासूनच सकाळी लवकर जाऊन मतदान करायची इच्छा होती. त्याप्रमाणे मी सकाळी लवकर येऊन मतदान केलं आहे".


मतदान करणं फार महत्त्वाचं : प्रशांत दामले


तरुणांना आवाहन करत प्रशांत दामले म्हणाले,"आमची पिढी आणि आताची पिढी यांच्या वेगात खूप अंतर आहे. तरुणांचं सर्व मोबाईलवर चालतं. पण मतदान हे प्रत्यक्ष येऊनच करावं लागतं. त्यामुळे सर्व तरुण मतदारांना विनंती करेल की,आज ऑफिसला जाण्याआधी मतदान केंद्रात जाऊन मतदान करा. मतदान करणं फार महत्त्वाचं आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून आपण मतदानातही 1 नंबर राहिलो पाहिजे". 


मतदान करण्याआधी प्रशांत दामले यांनी 'एक्स'वर मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. प्रशांत दामले म्हणाले होते,"आपले मुंबई पोलिस अहोरात्र आपले कर्तव्य करत असतात. सोमवारच्या मतदानासाठी मुंबईत त्यांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. शासन मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रयत्नशील आहे. माझी अपेक्षा आहे की, देशाची आर्थिक राजधानी म्हणून देशातील सर्वाधिक मतदानाची टक्केवारी मुंबईतून असायला हवी. दुसरे म्हणजे मतदान नाही केले तर आपल्याला बोलण्याचा हक्क राहत नाही. केवळ फेसबुक व सोशल मीडियावर बोलून उपयोग नाही. त्यामुळे मतदान करून प्रश्न विचारण्याचाही हक्क मिळवा". मराठी कलाकारांसह बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. यात शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), आयुष्मान खुराना, शिल्पा शेट्टी अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे.


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : शाहरुख खान, अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टी ते आयुष्मान खुराना; बोटाला शाई लागण्याआधी बॉलिवूडकरांचं चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन