(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Lok Sabha Seat : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य, उमेदवारीवर म्हणाले...
नांदेडची पोटनिवडणूकीत काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना मैदानात काँग्रेसने उतरवले आहे. तर भाजपकडून अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असताना यावर आता अशोक चव्हाण यांनी स्पष्टोक्ती दिली आहे.
Nanded Lok Sabha By Election नांदेड : नांदेडची पोटनिवडणूक घोषित झाल्यानंतर काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना मैदानात काँग्रेसने उतरवले आहे. तर भाजपकडून अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र या संदर्भात अशोक चव्हाण (Ashok Chavan) नांदेडची लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला असत्यात या बातम्या चुकीच्या आहेत. शिवाय या बाबत प्रसारित होणाऱ्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. ते नांदेड येथे बोलत होते.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबत केंद्रीय निवडणूक आयोगानं नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची देखील घोषणा केली आहे. काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानं नांदेडची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानादिवशीच म्हणजे 20 नोव्हेंबरलाच या लोकसभेसाठी मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल असेल. तर दुसरीकडे काँग्रेसनं अपेक्षेप्रमाणं या जागेवर वसंतराव चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. शिवाय एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील नांदेडमधून पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तर भाजपनं देखील नांदेडच्या जागेसाठी तयारी सुरु केली असून माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती आहे. मात्र यावर आता स्वत: भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी भाष्य करत यावर स्पष्टोक्ती दिली आहे.
संजय राऊतांना ते कळलं, आनंदाची गोष्ट
अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरुन टोलेबाजी केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतल्याची चर्चा आहे. जागावाटपाची चर्चा करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नसून, दिल्लीतील नेतेच त्यांचा निर्णय घेतात असंही राऊतांनी म्हटल्याची चर्चा आहे. त्यावर अशोक चव्हाण म्हणाले, संजय राऊतांना हे कळाले ही आनंदाची गोष्ट आहे. मविआमध्ये जागा कशा वाटायच्या, कोणाला द्यायच्या हा त्यांचाच प्रश्न आहे अशोक चव्हाण यांनी सांगितले
जरांगे यांचा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा राहावा
दरम्यान, खासदार अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याबाबतही भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील यांनी उद्या बैठक बोलावली आहे. त्या बैठकीमध्ये जरांगे यांचा निर्णय हा महाराष्ट्राच्या हितासाठी राहावा. आगामी काळ खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांचाही निर्णय हा महाराष्ट्राच्या हितासाठी चांगला राहावा ही विनंती आणि अपेक्षा आहे, असं अशोक चव्हाण यांनी सांगितले
हे ही वाचा