Nagpur West Vidhan Sabha 2024: नागपूर पश्चिममध्ये काँग्रेसचे शहर अध्यक्ष गुलाल उधळणार, की भाजप आव्हान मोडीत काढणार? नागपूर पश्चिममध्ये कोण बाजी मारणार?
Nagpur West Assembly Constituency : राज्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जाणाऱ्या नागपूरातील 12 मतदारसंघासह नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Nagpur West VidhanSabha 2024 : संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024)ची रणधुमाळीला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर मतदारांचा अंतिम कौल सर्वापुढे असणार आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राजकीय हालचालींना प्रचंड वेग आले असून सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जंगी प्रचार केला जात आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) यंदा मुख्य लढत होणार असून इतर अनेक पक्षदेखील यंदा निर्णायक ठरतील असे सध्याचे चित्र आहे.
अशातच राज्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जाणाऱ्या नागपूरातील 12 मतदारसंघासह नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात (Nagpur West Assembly Constituency) यंदा कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघातून काँग्रेसने शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांना मैदानात उतरवले आहे. तर माजी आमदार सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale) यांना परत एकदा संधी देत भाजपने विकास ठाकरे, बसपाचे प्रकाश गजभिये विरोधात उभे केलं आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत कोण गुलाल उधळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपच्या सुधाकर कोहळे विरुद्ध काँग्रेसचे शहर अध्यक्षामध्ये सामना
पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे हे मुळात शिक्षक असून समोरच्याच्या मनात शिरण्याचे त्यांच्यात कसब आहे. कोहळे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सुधाकर कोहळे यांनी 2014 ते 2019 पर्यंत, नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं होते. कोहळे हे नागपूर महानगरपालिकेत (NMC) निवडणुकीच्या वेळी नगरसेवक होते , त्यानंतर त्यांनी म्हाळगी नगर प्रभागाचे प्रतिनिधीत्व केले होते. कोहळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दीनानाथ पडोळे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा पराभव केला आहे . पडोळे यांच्यासह पंधरा विरोधकांचे डिपॉझिट गमवावे लागले. तसेच सुधाकर कोहळे हे महापालिकेच्या जल बांधकाम समितीचे अध्यक्ष देखील राहिले आहे.
लोकसभेनंतर विधानसभेसाठी विकास ठाकरे मैदानात
विदर्भातील सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक समजल्या जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात (Lok Sabha Election Result 2024) भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्यात थेट लढत झाली होती. मात्र यात गडकरी यांनी विजयाची हॅटट्रिक केली तर काँग्रेसच्या विकास ठाकरेंना दारूण पराभवाला समोर जावे लागले. या निवडनुकीनंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे विधानसभेसाठी आपले नशीब आजमावत आहे. त्यामुळे या लढतीत मतदारराजा कोणाला कौल देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोण आहेत विकास ठाकरे?
आ. विकास ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत एकूण 8 निवडणुका लढविल्या आहेत. महापालिकेची निवडणूक पाच वेळा लढले व तीन वेळा जिंकले, तर विधानसभेची निवडणूक तीन वेळा लढले व एकदा जिंकले. नागपूर लोकसभेच्या निमित्ताने ते नवव्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. 1997 मध्ये ठाकरे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अपक्ष म्हणून महापालिकेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी ते पराभूत झाले. मात्र, काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. यानंतर 2002 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली अन् ते विजयी झाले व पहिल्याच टर्ममध्ये नागपूरचे महापौर बनले.
यानंतर 2007 मध्ये विजयी होत ते महापालिकेचे विरोधी पक्षनेते झाले.2012 मध्येही त्यांनी विजय नोंदविला. 2017 मध्ये मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभेच्या निवडणुकीत 2009 मध्ये दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लढत दिली व पराभूत झाले. पुढे 2014 मध्येही पश्चिम नागपुरात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 2019 मध्ये मात्र त्यांना पश्चिम नागपुरातून विधानसभा गाठण्यात यश आले.
हे ही वाचा