एक्स्प्लोर

Nagpur North Vidhan Sabha : सर्वाधिक उमेदवारांच्या लढतीत उत्तर नागपूरच्या गडावर काँग्रेसचे वर्चस्व; नितीन राऊतांची सरसी, भाजपचा पराभव

Nagpur North Vidhan Sabha: नागपूरच्या 12 मतदारसंघासह उत्तर नागपुरातील अतितटीच्या लढतीत यंदा महायुती की मविआ, या पैकी कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Nagpur North Vidhan Sabha constituency Election 2024 Result : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. सत्तेत येण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष ताकदीने प्रयत्न केले. दरम्यान, या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपूर विधानसभा (Nagpur North Vidhan Sabha) मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कारण नागपुरातील 12 मतदारसंघापैकी या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 26 उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात आहे, ज्यातील सुमारे 11 अपक्ष उमेदवारांनी शड्डू ठोकला होता. त्यामुळे एकंदरीत उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार आणि लहान पक्षाच्या उमेदवारांनी मोठ्या पक्षांची चिंता वाढवली असल्याचे चित्र होती. तर दुसरीकडे बौद्ध आणि मुस्लीम मतांच्या विभाजनाचा फटका प्रमुख उमेदवारांना बसून प्रस्थापितांमध्येही काटेची टक्कर होण्याची शक्यता होती.

मात्र अनेक अडथळांचा टप्पा पार करत अखेरे उत्तर नागपूर मतदारसंघातून माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत (Dr Nitin Raut) यांनी बाजी मारली आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपने पुन्हा एकदा डॉ. मिलींद माने (Dr Milind Mane) यांच्यावर विश्वास दाखवत मैदानात उतरवले. मात्र त्यात त्यांना पराभवाला समोर जावे लागले आहे.

डॉ. नितीन राऊत विरुद्ध डॉ. मिलींद माने यांच्यात थेट लढत 

दरम्यान, उत्तर नागपूर मतदारसंघातून माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत (Dr Nitin Raut) यांच्याविरोधात भाजपने पुन्हा एकदा डॉ. मिलींद माने (Dr Milind Mane) यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. डॉ. माने यांनी 2014 मध्ये नितीन राऊत यांचा पराभव केला होता. तर 2019 मध्ये डॉ. राऊत (Dr Nitin Raut) यांनी डॉ. मानेंना पराभूत करून आपला पराभवाचा वचपा काढला होता. आळीपाळीच्या या खेळी नंतर तिसऱ्यांदा भाजप आणि काँग्रेसच्या या दोघा दिग्गजांमध्ये ही लढत रंगणार आहे. त्यामुळे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात महायुती की मविआ, या पैकी कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.   

अनुसूचित जातीच्या मतांचे विभाजन 

उत्तर नागपूर हा एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचा गड होता. आंबेडकरी विचारधारेला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. मात्र विद्यमान आमदार डॉ. नितीन राऊत यांनी १९९९ पासून चार वेळा उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. तर 2014 मध्ये भाजपच्या डॉ. मिलिंद माने यांनी डॉ. नितीन राऊतांचा पराभव करत हा विजयी अश्व रोखून धरला. यावेळी अनुसूचित जातीच्या मतांचे विभाजन होऊन यावेळी काँग्रेसला फटका बसल्याने भाजपच्या डॉ. मानेंचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या मतांचे विभाजन झाले तरच भाजपसाठी संधी निर्माण होऊ शकते, हे स्पष्ट आहे. हे समीकरण बघता डॉ. मानेंच्या विजयासाठी भाजप धुरीण काय डावपेच आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, बसपचे बुद्धम राऊत आणि अपक्षांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget