Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होण्याची शक्यता
Parliament Monsoon Session : आगामी पावसाळी अधिवेशना दरम्यान राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.
Parliament Monsoon Session : संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन ( Monsoon Session) 18 जुलैपासून सुरू होणार आहे. पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत या तारखांची शिफारस केली गेली आहे. अशी माहिती सूत्रांनी ही माहिती दिली आहे
आगामी पावसाळी अधिवेशन 17 दिवस होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनादरम्यान राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. 18 जुलै ला राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीची अद्याप घोषणा झालेली नाही. राष्ट्रपती निवडणुकीनेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटीची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या समितीने 18 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशनाशाचे आयोजन करावे अशी शिफारस केली आहे. आता तारखांवर विचार विचाक करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपणार आहे. कोण होणार देशाचा नवा राष्ट्रपती... या प्रश्नाचं उत्तर 21 जुलैला मिळणार आहे. 18 जुलै रोजी मतदान तर 21 जुलैला मतमोजणी आहे. राष्ट्रपती पद हे घटनात्मकदृष्ट्या सर्वोच्च पद, देशाचे प्रथम नागरिक. या पदासाठी यावेळी मोदींची निवड काय असणार याची उत्सुकता असेल.