एक्स्प्लोर

अजित पवारांचा प्रवक्ता शरद पवारांच्या कारमध्ये; रोहित पवार संतापले, म्हणाले उमेश पाटलांना आमचा विरोध 

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सलग तिसऱ्या दिवशी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rohit Pawar on Umesh Patil : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सलग तिसऱ्या दिवशी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उमेश पाटील यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश दिला जात असेल तर आमचा त्याला विरोध असेल अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परीषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

उमेश पाटील यांच्या प्रवेशाला माझा विरोध 

शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीत टीका करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत प्रवेश नको असे रोहित पवार म्हणाले आहेत. कार्यकर्ता म्हणून उमेश पाटील यांच्या प्रवेशाला माझा विरोध असेल असे रोहित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सलग तिसऱ्या दिवशी शरद पवारांची भेट घेतली.अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेश पाटील यांनी राजीनामा देऊन 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला. मात्र, अद्याप उमेश पाटील यांचा राजीनामा स्वीकारला नाही. आज उमेश पाटील आणि शरद पवार यांचा एकत्रित गाडीतून प्रवास केला. त्यामुळं उमेश पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

राजीनामा पत्रात नेमकं काय म्हणाले उमेश पाटील?

जवळपास महिनाभरापूर्वी म्हणजे 24 सप्टेंबरला उमेश पाटील यांनी राजीनामा दिला आहे. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वीकारला नाही.राजीनामा पत्रात उमेश पाटील यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात येत असलेला दुजा भाव यावर बोट ठेवलं आहे. तसेच माजी आमदार राजन पाटील यांच्यासारख्या महिलांवर अतिशय खालच्या पातळीत बोलणाऱ्या व्यक्तीला पक्षात ठेवलं कसं? असा सवाल देखील उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच आमदार यशवंत माने, आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार बबनदादा शिंदे यांनी पक्ष शिस्त मोडली, पण त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? मात्र माझ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचा उल्लेख उमेश पाटील यांनी केला आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून उमेश पाटील हे शरद पवार यांची भेट घेत आहेत. त्यामुळं ते शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

महत्वाच्या बातम्या:

Sharad Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्त्यांसह काही नेते शरद पवारांच्या भेटीला; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, मोदीबागेत घडामोडींना वेग

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant: 'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!
'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!
Vinayak Raut On Bal Mane : 'उद्धव ठाकरे अडीच वाजेपर्यंत थांबले, पण हा माणूस...; बाळ मानेंच्या 'त्या' खेळीवर विनायक राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले, 'दुसऱ्याला संधी मिळू नये म्हणून'
'उद्धव ठाकरे अडीच वाजेपर्यंत थांबले, पण हा माणूस...; बाळ मानेंच्या 'त्या' खेळीवर विनायक राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले, 'दुसऱ्याला संधी मिळू नये म्हणून'
Narayan Rane : बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
Nagpur Crime News: मुलीच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नासाठी मध्य प्रदेशातून नागपुरात आले; पुन्हा नीट परीक्षा देण्याची हिंमत नाही म्हणून विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, शेवटच्या चिट्ठीत म्हणाली....
मुलीच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नासाठी मध्य प्रदेशातून नागपुरात आले; पुन्हा नीट परीक्षा देण्याची हिंमत नाही म्हणून विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, शेवटच्या चिट्ठीत म्हणाली....

व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More:
"घोडेबाजार नाही, ही 100% सेटलमेंट!", वसंत मोरेंचा शरद पवार गटावर घणाघात, म्हणाले, 'पुण्यात पाठीत खंजीर खुपसला, मविआतून बाहेर पडा; मी वरिष्ठांना सांगितलंय!'
Uttamrao Jankar : मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला उत्तमराव जानकरांचा आरोप, धैर्यशील मोहिते पाटलांचं एका वाक्यात प्रत्युत्तर 
मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला उत्तमराव जानकरांचा आरोप, धैर्यशील मोहिते पाटलांचं एका वाक्यात प्रत्युत्तर 
Bal Mane : विनायक राऊत डोमकावळा, कोकणात शिवसेनेची वाट लावली, शिंदेंचे भाट म्हणून काम करतात, बाळ मानेंचा हल्लाबोल
विनायक राऊतांनी कोकणात शिंदेसेनेची सुपारी घेतली, ते शिंदेसेनेचे भाट, बाळ मानेंचा राणेंच्या घरासमोरुन पलटवार
Gold Silver Rate : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, शेअर बाजारात तेजी, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण
गुड न्यूज, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Captain Bharat Bhardwaj Viral Video : दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
RBI Policy: रेपो रेट जैसे थे पण आरबीआयकडून तीन स्पष्ट संदेश, महागाईचा धोका ते विदेशी गुंतवणूक वाढीचे प्रयत्न, जाणून घ्या सविस्तर
रेपो रेट जैसे थे पण आरबीआयकडून तीन स्पष्ट संदेश, महागाई वाढीचं संकट ते विदेशी गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न, जाणून घ्या सविस्तर
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Embed widget