एक्स्प्लोर

Manipur Election : मणिपूरमध्ये आत्तापर्यंत 27.34 टक्के मतदान, चुराचांदपूर येथे कार्यकर्त्यांमध्ये धरपकड

सात वाजल्यापासून मणिपूरमध्ये पहिल्या मतदानला सुरुवात झाली आहे. एकूण 38 जागांसाठी आज मतदान होत आहे. आत्तापर्यंत मणिपूरमध्ये 27.34 टक्के मतदान झाले आहे.

Manipur Phase 1 Polling : मणिपूरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मणिपूरमध्ये मतदानला सुरुवात झाली आहे. एकूण 38 जागांसाठी आज मतदान होत आहे. आत्तापर्यंत मणिपूरमध्ये 27.34 टक्के मतदान झाले आहे. तर या मतदानावेळी चुराचांदपूर जिल्ह्यात राजकीय कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिलत आहे. या वादात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र खराब झाले, ते दुरुस्त करण्याचे काम सुरु  असून, लवकरच मतदान चालू होणार आहे.

एकूण सहा जिल्ह्यामधील 38 जागांसाठी मतदान पार पडत आहे. दरम्यान, आज चार वाजेपर्यंतच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. चार वाजल्याच्या नंतर मतदान करता येणार नाही. तीन ते चार या वेळात कोरोना झालेल्या रुग्णांसाठी राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया येत्या 5 मार्चला पार पडणार आहे. तर या सर्व जागांचा निकाल 10 मार्चला लागणार आहे.

सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर उत्तर प्रदेशमधील मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. दरम्यन, आज मणिपूरमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडत आहे. या पहिल्या टप्प्यात 38 जागांसाठी 173 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या सर्वांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. 

मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पर पडणार आहे. यामधील पहिला टप्पा आज पार पडणार आहे. आज मणिपूरमध्ये 38 जागांवर मतदान होणार असून, यामध्ये 15 महिला उमेदवारांसह 173 उमेदवारांचे भवितव्य राज्यातील मतदार ठरवणार आहेत. पहिल्या टप्प्यात 6 लाख 29 हजार 276 महिला मतदारांसह 12 लाख 22 हजार 713 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज 15 महिलांसह 173 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या कर्मचार्‍यांचा मोठा ताफा सर्व 38 विधानसभा मतदारसंघात तैनात करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या निधनानंतर प्रथमच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; युगेंद्र पवारांकडून मुलाखती, सुनेत्रा पवारांकडून गाठीभेटी
अजित पवारांच्या निधनानंतर प्रथमच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; युगेंद्र पवारांकडून मुलाखती, सुनेत्रा पवारांकडून गाठीभेटी
भाजप स्वबळावर सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक जिंकेल, मंत्री जयकुमार गोरेंना विश्वास, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबतही मोठं वक्तव्य
भाजप स्वबळावर सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक जिंकेल, मंत्री जयकुमार गोरेंना विश्वास, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबतही मोठं वक्तव्य
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका,राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन
Maharashtra Dushkal : दुष्काळ जाहीर होणार, मदत कधी मिळणार Special Report
JainMuni KabootarKhana : पुन्हा धडपड कबुतरांसाठी फडफड Special Report
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Garba Ad Controversy: 'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
Weather Update : बंगालच्या उपसागरात ‘डीप डिप्रेशन’; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात ‘डीप डिप्रेशन’; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
Marathi vs Jain Mira Bhayandar: पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
CSK Zaheer Khan: चेन्नई सुपर किंग्जचा नवा डाव, IPL 2027 साठी झहीर खानवर सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी 
स्टीफन फ्लेमिंगनं साथ सोडली, चेन्नईनं नवा डाव टाकला, झहीर खानवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
Raju Shetti :  केंद्र सरकार टप्प्यात आलंय, दिवाळीला साखर हवी असेल तर 'या' तीन मागण्या मान्य कराव्या लागणार : राजू शेट्टी 
केंद्रीय अन्नपुरवठा मंत्र्याच्या हुबळी गावात शेतकऱ्यांचे आंदोलन, राजू शेट्टी यांची घोषणा     
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
Rahul Bondre and Rahul Gandhi: भाजप अन् श्वेता महालेंनी मुंबईत जय्यत तयारी केली पण राहुल गांधींच्या एका फोन कॉलने सगळा प्लॅन फिस्कटला, राहुल बोंद्रेंची अखेरच्या क्षणी माघार, नेमकं काय घडलं?
भाजप अन् श्वेता महालेंनी मुंबईत जय्यत तयारी केली पण राहुल गांधींच्या एका फोन कॉलने सगळा प्लॅन फिस्कटला, राहुल बोंद्रेंची अखेरच्या क्षणी माघार, नेमकं काय घडलं?
Embed widget