एक्स्प्लोर
Baramati | भाजपच्या वल्गना फोल, सुप्रिया सुळेंनी बारामतीचा गड राखला
जवळपास लाखभर मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड राखला. भाजप उमेदवार कांचन कुल यांचा सुळेंनी पराभव केला
मुंबई : 'बारामती' जिंकण्याच्या भाजपच्या वल्गना अखेर फोल ठरल्या आहेत. बारामतीचा गड राखण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. सुप्रिया सुळे पुन्हा एकदा खासदारपदी निवडून आल्या आहेत. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना पराभवाचा सामना करावा लागला.
बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे सलग तिसऱ्यांदा खासदारपदी निवडून आल्या आहेत.
सुप्रिया सुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत नक्की हरणार, असा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्या किती मतांच्या फरकाने हरतील, हेच पाहायचं आहे, असं पाटील म्हणाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही बारामतीची जागा जिंकण्याचा प्रबळ विश्वास व्यक्त केला होता. मात्र जवळपास लाखभर मतांची आघाडी घेत सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड राखला. या मतदारसंघात 10 अपक्ष उमेदवारांसह एकूण 18 जण निवडणुकीच्या रिंगणात होते.
बारामतीची निवडणूक देशातील प्रमुख लढतींपैकी एक समजली जात होती. बारामती पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार सलग पाच वेळा बारामतीतून खासदार होते.
Sharad Pawar Exclusive | मोदी सत्तेत आले, तरी सरकार 13 दिवसात पडेल, पवारांचं भाकित
जर बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असं वक्तव्य शरद पवार यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विस्फोटक मुलाखतीत केलं होतं. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, तेही बारामतीची जागा जिंकण्याचं धाडसाने सांगतात, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने ईव्हीएमशी छेडछाड करण्याचं काही नियोजन केलं आहे का, अशी शंका अनेकांच्या मनात असल्याचं पवारांनी बोलून दाखवलं होतं. त्यामुळे शरद पवारांना बारामतीचा गड गमावण्याची धास्ती वाटते का, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. तर, ईव्हीएमबाबत आपल्या मनात कुठलीही शंका नसल्याचं अजित पवार म्हणाले होते. कांचन कुल या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. राहुल कुल हे पुणे जिल्ह्यातील दौंडचे आमदार आहेत. राहुल कुल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटचे सहकारी मानले जातात. कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील असून त्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, भोर, खडकवासला या विधानसभा मतदारसंघांत बारामती मतदारसंघ विभागला गेला आहे. यापैकी दौंड, भोर, इंदापूर तालुक्यात कुल कुटुंबीयांचा प्रभाव असल्यामुळे कांचन कुल यांचं आव्हान तगडं मानलं जात होतं. बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी यंदा भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांनी बारामतीत प्रचार केला.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
राजकारण
जालना
Advertisement