एक्स्प्लोर

Shirol Vidhan Sabha : साखर सम्राटांचे आव्हान भेदून स्वाभिमानीत 'उल्हास' निर्माण करणार? राजू शेट्टींच्या नेतृत्वाची सुद्धा कसोटी!

Shirol Vidhan Sabha : परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ, हातकणंगले आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये उमेदवार दिला आहे.

Shirol Vidhan Sabha : काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संधी असूनही पदरी पडलेला पराभव, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जीवाचं रान करूनही शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचलेला योग्य संदेश, गेल्या मोसमात तुटलेल्या ऊसासाठी आंदोलन करून शंभर रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पाडून सुद्धा सकारात्मक न झालेला परिणाम आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव होऊन घटलेलं मताधिक्य या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर अस्तित्वाची लढाई आहे. राजू शेट्टी यांचा बालेकिल्ला असलेल्या शिरोळ विधानसभेला तिरंगी लढत होत असून स्वाभिमानीकडून उल्हास पाटील रिंगणात आहेत. काँग्रेसकडून गणपतराव पाटील आणि महायुतीच्या पाठिंब्याने राजेंद्र पाटील यड्रावकर रिंगणात आहेत.

राजू शेट्टींच्या स्वाभिमानीत दोन माजी आमदारांचा प्रवेश  

राजू शेट्टी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही सुद्धा बाजूला सारत तिसऱ्या आघाडीमध्ये सामील झाले आहेत. परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंगं फुंकलं आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ, हातकणंगले आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये उमेदवार दिला आहे. राज्यात 23 ठिकाणांवर राजू शेट्टी यांनी उमेदवार दिले आहेत. राजू शेट्टी यांनी विधानसभेला ठाकरे गटातील दोन माजी आमदार गळाला लावत मोठा हादरा दिला आहे. शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीसाठी बालेकिल्ला समजला जातो. ज्या तालुक्यातून राजू शेट्टी यांचे नेतृत्व राज्यस्तरावर गेलं त्याच तालुक्यांमध्ये राजू शेट्टींचे चळवळ काहीशी क्षीण झाली असताना कधीकाळी सोबत राहिलेल्या, संघटनेसाठी काम केलेल्या उल्हास पाटील यांची घरवापसी करण्यात राजू शेट्टी यांना यश आलं आहे. उल्हास पाटील यांना स्वाभिमानीने उमेदवारी दिल्याने शिरोळची लढाई आता तुल्यबळ होऊन गेली आहे.  

उल्हास पाटलांची घरवापसी, राजू शेट्टींना मोठं बळ

उल्हास पाटील यांनी तब्बल दहा वर्षांनी घरवापसी करताना आपण पुन्हा एकदा राजू शेट्टी यांचा सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक प्रकारे राजू शेट्टी यांना बालेकिल्ल्यांमध्ये मोठी ताकद मिळाली आहे. उल्हास पाटील यांनी 2014 मध्ये स्वाभिमानीकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता व विजयी सुद्धा झाली होते. 2019 मध्ये सुद्धा त्यांनी तुल्यबळ लढत दिली होती. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात त्यांनी 62 हजार 214 मते घेतली होती. त्यांचा 27824 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. स्वाभिमानीकडून सावकार मादनाईक रिंगणात होते. त्यांनी 51804 मते घेतली होती. त्यामुळे आताच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी आणि उल्हास पाटील एकत्र आल्याने दोन साखरसम्राटांचे आव्हान पेलणार का? याची उत्सुकता आहे. उल्हास पाटील यांच्या वैयक्तिक ताकदीसह 2014 पासून जरी ते शिवसेनेमध्ये असले तरी त्यांचा चळवळीशी संपर्क तुटलेला नव्हता. 

मनोज जरांगे पाटील शिरोळमध्ये सभा घेणार

दुसरीकडे, उल्हास पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भेट घेतली आहे. मनोज जरांगे यांची शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये सभा होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिरोळ विधानसभा मतदारसंघातून 52 हजारांवर मते राजू शेट्टी यांना मिळाली होती.

गणपतराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात

शिरोळ मतदारसंघातून काँग्रेसकडून गणपतराव पाटील रिंगणात आहेत. स्वर्गीय सा रे पाटील यांनी तब्बल पाचवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे गणपतराव पाटील यांच्या घराला जसा साखर कारखानदारीचा वारसा आहे तसाच राजकीय वारसा सुद्धा आहे. कारखान्याच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यामध्ये त्यांचं मोठं प्रस्थ आहे. क्षारपट जमीनीसाठी केलेलं कार्य सुद्धा उल्लेखनीय आहे. गणपतराव पाटील काँग्रेसकडून रिंगणात असल्याने आमदार सतेज पाटील यांची ताकद सुद्धा त्यांच्यासोबत असेल. 

राजेंद्र पाटील यड्रावकरांना महायुतीचा पाठिंबा 

2019 च्या निवडणुकीमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र 2024 च्या निवडणुकीमध्ये त्यांच्या स्वतःच्या शाहू आघाडी पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्याने ते स्वतःच्याच पक्षाकडून रिंगणात आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडूनही त्यांना पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे महायुतीचा पाठिंबा राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये असेल. खासदार धैर्यशील माने यांची सुद्धा त्यांना साथ असेल. त्यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याचा माध्यमातून जाळ पसरलं आहे. सुतगिरण्या, महाविद्यालये, संस्थात्मक राजकारणातून यड्रावकर कुटुंबीयांचा सुद्धा मतदारसंघांमध्ये मोठा पगडा आहे. त्यामुळे राजेंद्र पाटील यड्रावकर दुसऱ्यांदा निवडणुकीमध्ये बाजी मारणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Elon Musk : भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
VIP Number Plate : HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव, व्हीआयपी नंबर कोणाला मिळणार?
HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव कारण...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Local Ticket : AI वापरून बनवला लोकलचा 'पास' पण टीसीपुढे नापास Special Report
Shahjibapu patil Home Raid : शहाजीबापूंवर धाड, महायुतीत भगदाड? Special Report
Rane VS Rane : भाऊ घरी, निवडणुकीत राजकीय वैरी, नितेश राणेंचा निलेशसाठी सावधगिरीचा इशारा Special Report
Sanjay Raut Is Back : संजय राऊतांचं कमबॅक, विरोधकांना डोकेदुखी Special Report
Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे का ढकलल्या? राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Elon Musk : भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
VIP Number Plate : HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव, व्हीआयपी नंबर कोणाला मिळणार?
HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव कारण...
एड्सच्या साथीचे सिंहावलोकन करताना..
एड्सच्या साथीचे सिंहावलोकन करताना..
नाकात नथणी, गळ्यात काँग्रेसचा गमछा; शेवटच्या दिवशी गौतमी पाटील उतरली प्रचारात, उंचावला 'हात'
नाकात नथणी, गळ्यात काँग्रेसचा गमछा; शेवटच्या दिवशी गौतमी पाटील उतरली प्रचारात, उंचावला 'हात'
अन्यथा संपूर्ण निवडणुका 'स्थगित' कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण
अन्यथा संपूर्ण निवडणुका 'स्थगित' कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण
Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
Embed widget