Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शरद पवारांसमोर पहिल्यांदाच कण्हेरीत सभा; म्हणाले, बारामतीची तुतारी विधानसभेत वाजणार!
Harshvardhan Patil: बारामतीची तुतारी विधानसभेमध्ये वाजलीच पाहिजे, असं आवाहन देखील हर्षवर्धन पाटील यांनी केले.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग आहे. मी आणि शरद पवार (Sharad Pawar) एकत्र कण्हेरीतल्या या सभेत आहेत. शरद पवारांनी बारामती जगाच्या नकाशावर आणली. बारामती आणि इंदापूरसह दौंडची जागा आपली आली पाहिजे, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि इंदापुरमधील उमेदवार हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) म्हणाले. तसेच महाविकास आघाडी 170 च्या पुढे जागा जिंकणार, असा दावाही हर्षवर्धन पाटील यांनी या कण्हेरीच्या सभेत केला.
1 एप्रिलनंतरचे बिल शून्य झालं. त्याआधीच्या नोटीसा तयार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक केली जात. त्यासाठी हे सरकार आपल्याला बदलायचं आहे. राज्याची विस्कळीत झालेली घडी षरद पवार आपण बसवू शकता, असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. तसेच मंत्रालयात आता सर्वसामान्य माणसे जात नाही. हे असे कधी झालं नव्हतं. त्यातून मलिदा गँग वाढायला लागली आहे. कुणावर आपल्याला टीका करायची नाही. ते टीका करतात आपले काम होतंय. त्या दिवशी इंदापूरला आले आणि आमचं धुणे धुतले. एका व्यक्तीला महाराष्ट्रमध्ये जाऊन काहीही बोलण्याचा अधिकार आहे. टीका करून मते मिळत नाही, अशी अप्रत्यक्षपणे टीकाही हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. तसेच बारामतीची तुतारी विधानसभेमध्ये वाजलीच पाहिजे, असं आवाहन देखील हर्षवर्धन पाटील यांनी केले.
युगेंद्र पवार काय म्हणाले?
57 वर्षांनी शरद पवार माझा फॉर्म भरण्यासाठी तहसीलदार कार्यालयात आले. शरद पवारसाहेब तुमचा विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ. जगभरात बारामतीचे नाव शरद पवारांनी मोठं केलं. आज आणि उद्या पण माझे आदर्श शरद पवार असणार आहेत. हा पठ्ठ्या शरद पवारांना सोडत नसतो. काल आज आणि उद्या सोबत असेल. आयुष्यभर सोबत असेल. माझ्या वडिलांना शरद पवारांनी मुंबई दाखवली. हे मी कधी विसरू शकत नाही. भाजपसोबत जायचं नाही हे आपण ठरवलं आहे, असंही युगेंद्र पवार म्हणाले. लाडक्या बहीण योजना आणली, पण त्यात अटी टाकल्या. महिलांना शरद पवारांनी दिला. गुन्हेगारी वाढली आहे. मोठे उद्योग धंदे न आल्याने बेरोजगारी वाढली आहे. अख्ख्या महाराष्ट्रमध्ये तुतारी वाजेल, तेव्हा बारामतीत पण तुतारी वाजली पाहिजे. मी पूर्ण वेळ तुम्हाला देईल. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल, असंही युगेंद्र पवार यांनी सांगितले.