Sharad Pawar: 'महाराष्ट्राने अनेकदा माझा शब्द मान्य केला...', शरद पवारांनी पहिल्याच सभेत मारला चौकार, पक्षफुटीवर केलं भाष्य
Sharad Pawar: प्रचारसभेवेळी बोलताना शरद पवार यांनी पक्षफुटीपासून ते विकास या सर्व मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं गेलं. यावर देखील बोलत असताना केंद्र सरकारवरती देखील टीका केली आहे.
बारामती: विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आता सभा, दौरे, उमेदवारी अर्ज दाखल करणं या घडामोडींना वेग आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाने आज बारामतीच्या कन्हेरी गावातून बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे आज युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची पहिली सभा कन्हेरीत पार पडत आहे. प्रचारसभेवेळी बोलताना शरद पवार यांनी पक्षफुटीपासून ते विकास या सर्व मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं गेलं. यावर देखील बोलत असताना केंद्र सरकारवरती टीका केली आहे.
मी उभारलेला पक्ष माझ्याकडून काढून घेतला - शरद पवार
सभेवेळी बोलताना शरद पवारांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन कोणी केला? हा पक्ष मी काढला. मी उभारलेला पक्ष माझ्याकडून काढून घेतला. केंद्र सरकारमध्ये चक्र फिरली आणि आमचा पक्ष दुसऱ्याला देण्यात आला. पक्ष चिन्हं दुसऱ्याला देऊन टाकलं. आयुष्यात कधीही मी कोर्टात गेलो नाही. काही लोकांनी आमच्यावर खटला दाखल केला. आमच्यावर केस केली. कोर्टात माझ्या नावाने समन्स काढलं गेलं. समन्स कधी पाहिलं नव्हतं. तक्रार माझ्या नावाने तक्रार. निवडणूक आयोगाने निकाल दिला, पक्ष आणि चिन्हं दुसऱ्याचे शरद पवारांचा काही संबंध नाही. पक्ष, चिन्हं गेलं. नवीन चिन्हं घ्यावं लागलं. इतकं करून थांबलो नाही. लोकांना विनंती केली आमचे उमेदवार निवडून द्या, महाराष्ट्राने अनेकदा माझा शब्द मान्य केला, अनेकदा राज्यातील जनतेने आमच्या विचारांच्या हातात सरकार दिलं.
महाराष्ट्राने अनेकदा माझा शब्द मान्य केला- शरद पवार
महाराष्ट्राने अनेकदा माझा शब्द मान्य केला. राज्य आमच्या विचारांच्या लोकांच्या हातात दिलं. चारवेळा मुख्यमंत्री करणं काय साधी गोष्ट नाही. देशाचा संरक्षणमंत्री, १० वर्ष कृषीमंत्री, आणखी काय द्यायचं लोकांनी. राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून तुम्ही निवडून दिले. सलग सरकार आमच्या विचारांचं होतं. ४ वेळा उपमुख्यमंत्री बारामतीचा झाला. पाचव्यांदा भाजपची मदत घेतली. काही फायदा नव्हता. गेल्यावेळी विधानसभेची लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी भाजपन मत नव्हतं दिले तरी मग मदत का घेतली? राष्ट्रवादीचा उमेदवार होता म्हणून दिली होती, असंही शरद पवारांनी यावेळी सभेत बोलताना म्हटलं आहे.
शरद पवारांकडून भरसभेत अजित पवारांच्या रडण्याची नक्कल
शरद पवार यांनी सभेत अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. शरद पवारांच्या या कृतीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शरद पवार यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.अजित पवार यांची नक्कल केल्यानंतर शरद पवार बोलताना म्हणाले, हा प्रश्न भावनेचा नाही. हा मुद्दा तत्त्वाचा आणि विचारांचा आहे. आम्ही गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेतले आहे. मी याच विचारांनी काम करतो. गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण, ज्योतीराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे या सर्वांची विचारधारा ही माझी विचारधारा आहे. या विचारधारेसाठी मी काम करणार. हीच माझी पद्धत आहे.
ज्याची सत्ता सामान्यांच्या हाती द्यायची
मी गेल्या चार महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक तालुके पालथे घातले आहेत. कारण मला महाराष्ट्रातील सत्ता बदलायची आहे. राज्याची सत्ता सामान्यांच्या हाती द्यायची आहे. ते करायचं असेल तर तुम्ही-आम्ही एकजुटीने आपली शक्ती उभी केली पाहिजे, असे सांगत शरद पवार यांनी बारामतीच्या जनतेला साद घातली.
घरात दोन भाऊ असतील तर एकाने शेती आणि दुसऱ्याने नोकरी..
घरात दोन भाऊ असतील तर एकाने शेती आणि दुसऱ्याने नोकरी करायची असते. आम्ही सत्ता लोकांसाठी वापरली, आम्ही रोजगार दिले. बारामतीत मलिदा गँग शब्द आहे. आम्ही ही गँग कधी वाढू दिली नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
चार महिन्यांनी पद मिळाले असते. पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का?
पक्षात मी मार्गदर्शन करायची जबाबदारी घेतली आणि नवी पिढ्याच्या हातात अधिकार दिला. पण सत्ता नाही म्हणून सहकाऱ्यांनी आमचा साथ सोडली. आमच्या काही लोकांनी उद्योग केला आणि पहाटे शपथ घेतली, राज्यपाल यांना उठवले कशासाठी? चार महिन्यांनी पद मिळाले असते. पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का? घर मोडणे माझा स्वभाव नाही. कुटुंब एक राहिले पाहिजे ही माझी भूमिका असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.