एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Junnar Vidhansabha election 2024 : जुन्नरमध्ये पोस्टल मतमोजणीत सत्यशील शेरकर आघाडीवर, अजित पवार गटाच्या अतुल बेनके यांना पहिला धक्का

Junnar Vidhansabha election 2024 : जुन्नर मतदारसंघामध्ये पोस्टल मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सत्यशील शेरकर आघाडीवर आहेत.

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 तारखेला पार पडले होते. त्यानंतर आज मतमोजणी होत आहे. प्रथम पोस्टल मतांची मतमोजणी सुरू होत झाली असून अवघ्या काही क्षणात पहिला कल हाती आला आहे. जुन्नर मतदारसंघामध्ये (Junnar Vidhansabha election 2024 ) पोस्टल मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सत्यशील शेरकर (Satyasheel Sherkar) आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अतुल बेनके (Atul Benke) यांना हा पहिला मोठा धक्का आहे. (Junnar Vidhansabha election 2024 )

या मतदारसंघात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अतुल वल्लभ बेनके (Atul Benke) हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहे. तर  शरद पवारांच्या (NCP Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसकडून जुन्नरचे काँग्रेसचे नेते, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर (Satyasheel Sherkar) यांना संधी देण्यात आली होती.

जुन्नर मतदारसंघामध्ये (Junnar Vidhansabha election 2024 ) बेनके (Atul Benke) कुटुंबाचं वर्चस्व आहे. अतुल बेनके (Atul Benke) यांचे वडील वल्लभ बेनके यांनी चारवेळा आमदारकी मिळवली होती. वल्लभ बेनके त्यांच्यानंतर आता मतदरासंघातील जनतेने अतुल बेनके (Atul Benke) यांना संधी दिली होती. तर दुसरीकडे सत्यशील शेरकर (Satyasheel Sherkar) यांनी गेल्या दोन वर्षांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. शेरकर (Satyasheel Sherkar) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या लोकसभा निवडणूकीच्या (Loksabha Election) प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. या मतदारसंघात दोन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. (Junnar Vidhansabha election 2024 )

कोण आहेत सत्यशील शेरकर? (Who Is Satyashil Sherkar)

सत्यशील शेरकर (Satyasheel Sherkar) हे काँग्रेसचे दिवंगत नेते सोपानशेठ शेरकर यांचे सुपुत्र आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून ते शेतकरी आणि युवकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. जुन्नर तालुक्यातल्या युवा वर्गात सत्यशील शेरकर (Satyasheel Sherkar) यांची चांगली क्रेझ आहे. 

2019 विधानसभा निवडणुकीत काय झालं?

2019 च्या निवडणुकीमध्ये अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतुल बेनके (Atul Benke) यांनी विजय मिळवला होता. मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या शरद सोनवणेंचा पराभव झाला होता. अतुल बेनकेंना 74,958 तर शरददादा सोनवणेंना 65,890 आणि अपक्ष लढलेल्या आशाताई बुचकेंना 50,041 मते मिळाली होती. या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षफुटीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. (Junnar Vidhansabha election 2024 )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Amit Thackeray vs Sada Sarvankar: मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Embed widget