Hinganghat Vidhan Sabha Election 2024 हिंगणघाट : विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Assembly Elections 2024) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून या निवडणुकीची रणधुमाळीला जोरदार सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांच्या तयारीलाही वेग आला आहे. अशातच, राज्यात महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघात नेमकं कुणाचं वर्चस्व असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


वर्ध्याच्या राजकीय पटलावर कधीकाळी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. पण, गेल्या दहा वर्षात भाजपने येथे चांगलीच मुसंडी मारली होती. पण, या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा गटाच्या शिवसेनेने मूठ बांधली आणि प्रचारात आघाडी घेतली. असे असले तरी गेल्या लोकसभेच्या वेळी विदर्भासह वर्ध्यातही महायुतीला जबर धक्का बसल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे आगामी विधनसभा निवडणुकीला नेमकं कुणाची हवा असणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. असे असले तरी त्याआधी वर्धा जिल्ह्यातील 4 मतदारसंघातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात (Hinganghat Vidhan Sabha Election 2024) सध्या राजकीय परिस्थिति काय? हे सविस्तर जाणून घेऊया. 


समीर कुणावार यांना तिसऱ्यांदा भाजपची उमेदवारी


भाजपच्या पहिली यादी जाहीर झाली, या यादीत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार समीर कुणावार यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर झाले आहे. भाजपने आमदार कुणावार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याने तिसऱ्यांदा कुणावर हॅट्रिक करणार असल्याचा विश्वास समीर कुणावार यांनी व्यक्त केला आहे. दहा वर्षात केलेल्या कामाची पावती मतदार देतील असाही आत्मविश्वास त्यांनी बोलून दाखवलाय.


शरद पवार गटाकडून अतुल वांदीले मैदानात


हिंगणघाट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी आणि माजी आमदार राजू तिमांडे हे देखील या शर्यतीत इच्छुक होते. मात्र आता भाजपने आमदार कुणावार यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करत पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात अतुल वांदीले विरुद्ध भाजपच्या समीर कुणावार यांच्यात सामना रंगणार आहे. 


यात अतुल वांदिले यांनी दोन वर्षांपासून सक्रिय होत भाजपला टक्कर देण्याची तयारी केली आहे. तर शिवसेना उबाटा गटाकडून विठ्ठल गुडघाणे उमेदवारी मागत आहे. तर महायुतीमध्ये आमदार समीर कुणावार यांना कुणी प्रतिस्पर्धी नसल्याने समीर कुणावार यांना तिसऱ्यांदा भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र 


 समीर कुणावार विजयाची हॅट्रिक करणार?


हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील विधानसभा 2019 च्या निवडणुकीत महायुतीमध्ये बंडखोरी झाली होती. शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. तर राष्ट्रवादीचे नेते  सुधीर कोठारी यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शेवटच्या दिवशी हा अर्ज मागे घेत त्यांनी निवडणुकीमधून माघार घेतली. हिंगणघाटमध्ये  भाजपचे आमदार समीर कुणावर आणि राष्ट्रवादी चे माजी आमदार राजू तिमांडे यांच्यात लढत झाली. मात्र या लढतीत भाजपच्या समीर कुणावर यांनी तब्बल 1 लाख 3 हजार  585 मते घेऊन राष्ट्रवादीच्या राजू तिमांडे यांचा पराभव केला. भाजपचे समीर कुणावर यांनी सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवला होता. तर राजू तिमांडे यांना 53 हजार 130 मते पडली  असून त्यात त्यांचा पराभव झाला होता.


हिंगणघाट विधानसभेत 2019 मध्ये कुणाला किती मतं?


भाजप - समीर कुणावार(103585)
एनसिपी - राजू तिमांडे ( 53130)
अपक्ष - अशोक शिंदे (12623)


विजयी - समीर कुणावार


इतर महत्वाच्या बातम्या