Sambhajiraje Chhatrapati : परिवर्तन महाशक्तीमधून तिसरी आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) उतरली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सोबत न जाता परिवर्तन महाशक्तीमध्ये माजी खासदार संभाजी राजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू आदी नेत्यांनी एकत्रित महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीकडून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी यांची  विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगली असतानाच आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र संभाजीराजे यांनी कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. 


नाशिक आणि इतर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक


संभाजीराजे यांनी नाशिक आणि इतर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे अंतिम निर्णय मंगळवारी घेणार असल्याचं त्यांनी सांगत अजून एक द्विधा मनस्थितीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याची उत्सुकता आहे. दरम्यान, आज पुण्यामध्ये भाजप नेते उज्वल केसकर यांनी संभाजी राजे यांची भेट घेतली. उज्वल केसर केसकर हे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. स्वराज्य पक्षाच्या कार्यालयामध्ये संभाजीराजे यांची उज्वल केसकर यांनी भेट घेतली. ही भेट राजकीय असल्याची माहिती आहे. या भेटीनंतर संभाजी राजे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की उज्वल केसकर यांनी माझी भेट घेतली असून पुण्यातील विकासामध्ये त्यांचे योगदान मोठं आहे. केसकर यांनी माझ्याशी राजकीय चर्चा केली असून त्यांचा हेतू पुण्याच्या विकासाबाबत असल्याचे संभाजीराजे म्हणाले. 


माजी महापौर दशरथ पाटील यांना पहिला एबी फॉर्म


दरम्यान, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्यावतीने नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांना पहिला एबी फॉर्म देण्यात आला आहे. दशरथ पाटील यांना नाशिक पश्चिम विधानसभा मधून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने उमेदवारी दिली आहे. दशरथ पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती, सरचिटणीस धनंजय जाधव यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला होता. दरम्यान, काल (26 ऑक्टोबर) संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीत भेट घेतली होती. जरांगे यांना स्वराज्य पक्षाकडून लढण्याची ऑफर दिली आहे. यावेळी संभाजीराजे यांनी तुमचा आणि आमचा शत्रू एकच म्हणजे भाजप असल्याचे म्हटले होते. यावेळी एकत्रित निवडणूक लढवण्यावर संभाजीराजे यांनी भर दिला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या