Maharashtra Vidhan Sabha Election 2024: गोंदिया जिल्हा हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा गृह जिल्हा मानण्यात येतो. दरम्यान, अर्जुनी मोरगाव विधानसभेची (Arjuni Morgaon Legislative Assembly) जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सुटली आहे. अशातच या क्षेत्रामध्ये काँग्रेसने (Congress) जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र उमेदवारी जाहीर केल्यानंतर क्षेत्रांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बनसोड यांच्या उमेदवारीला स्थानिक काँग्रेस नेत्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला असून बाहेरचा पार्सल उमेदवार चालणार नाही. त्यांच्या जागी बदलून नवीन उमेदवार द्यावा. अशी आग्रही मागणी केली आहे. परिणामी, स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावा अन्यथा काँग्रेस उमेदवाराला मतदान कारणार नसल्याची काँग्रेस कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली आहे. तर गरज पडल्यास अर्जुनी मोरगाव विधानसभेत बंडखोरीचे संकेतही यावेळी दिले आहे.









काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गृह जिल्ह्यात काँग्रेसची वेगळी चूल?


अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील ज्या 14 स्थानिकांनी उमेदवारी मागितली त्यांनाच उमेदवारी देण्याचे यावी, अन्यथा पक्षाचे काम करणार नाही आणि जो अपक्ष काँग्रेस कार्यकर्ता निवडणुकीमध्ये उभा राहील त्याचं काम करण्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठरवले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभेमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परिणामी, आता काँग्रेसमधील बंडखोरीकडे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.


काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड नेमके कोण?


दिलीप बनसोड हे 2004 ते 2009 पर्यंत तिरोडा विधानसभेचे आमदार राहिले आहेत....


त्यानंतर त्यांनी 2009, 2014, 2019 अशा तीन निवडणुका लढविल्या मात्र, त्यात एकही निवडणुकीत त्यांना विजय मिळवता आला नाही..


सध्या ते काँग्रेस कमिटीचे गोंदिया जिल्हाध्यक्ष असून त्यांना अर्जुनी मोरगाव विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे ते मूळचे तिरोडा तालुक्यातील रहिवासी आहेत ...


भंडाऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी


पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यातील सात विधानसभेपैकी एकाही ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. त्यामुळं शिवसैनिकांमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांबाबत प्रचंड रोष बघायला मिळतोय. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हे शिवसैनिकांच्या भरोशावर निवडून आले होते आणि नंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने भंडाऱ्याच्या जागेवर ठाकरे गटानं दावा सांगितला होता. विधानसभेची जागा हक्काची असल्यानं ती शिवसेनेला मिळेल, असं बोलल्या जात होतं. मात्र, भंडाऱ्याची जागा शिवसेनेला न देता काँग्रेसनं स्वतःकडं राखून घेतली. भंडाऱ्यात महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसकडून पूजा ठवकर यांना उमेदवारी दिली असून मागील अनेक महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये काँग्रेस विरोधात प्रचंड रोष बघायला मिळतोय. त्यामुळं या विधानसभेत भंडाऱ्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे.


हे ही वाचा