सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी प्रक्षोभक भाषण करू नका अशा आशयाच्या नोटीस उमेदवारांना अनेकदा दिल्या जातात. पण त्या त्यांच्या घरी किंवा पक्ष कार्यालयात दिल्या जातात. सोलापुरात मात्र वेगळंच घडलं. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा सुरू असतानाच, स्टेजवरच पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. प्रक्षोभक भाषण करू नका अशा आशयाची ती नोटीस असल्याची माहिती आहे. 


सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारसभेला खासदार असदुद्दीन ओवैसी आले होते. त्यावेळी इतरांचे भाषण सुरू असतानाच सोलापूर पोलिसांनी त्यांना स्टेजवरच नोटीस दिली. ओवैसी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही अशी प्रक्षोभक भाषा वापरू करू नये अशी पोलिसांनी नोटीस दिली. भारतीय नागरिक संहिता कलम 168 प्रमाणे पोलिसांनी ही नोटीस दिल्याची माहिती आहे. 


इंग्रजीत नोटीस मागितली


खासदार ओवैसी यांना सोलापूर पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर ती मराठीत असल्याचं त्यांना लक्षात आलं. त्यावेळी ओवैसी यांनी त्या नोटीसचा मोबाईलमध्ये फोटो काढला. नंतर त्या नोटीसची इंग्रजीत प्रत मागवली. त्यानंतर नोटीसीची इंग्रजीतील प्रत आणण्यासाठी  पोलिस परत गेल्याचं दिसून आलं. 


सोलापूर मध्यमध्ये काँग्रेसला धक्का


सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत पठण यांनी एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. शौकत पठाण हे स्वतः सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र काँग्रेसने शौकत पठाण यांना उमेदवारी नाकारल्याने ते काही दिवसापासून नाराज होते. आज ओवैसी यांच्या सभेत थेट मंचावर येऊन शौकत पठण यांनी एमआयएम उमेदवार  फारुख शाब्दी यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं. 


फडणवीस व्होट जिहाद म्हणतात, तो आचारसंहितेचा भंग नाही का? 


लोकसभा निवडणुकीत व्होट जिहादमुळे भाजपचा अनेक जागांवर पराभव झाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. पण मग अयोध्येतही तुमचा पराभव कसा झाला? तिकडे तुम्हाला मतं का मिळाली नाहीत, असा सवाल एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संभाजीनगरमधील प्रचारसभेत उपस्थित केला. देवेंद्र फडणवीसांच्या जिभेवर माझे नाव आले. पण देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवावे की ते माझा सामना करु शकत नाही. मोदी-शाह आले तरी फडणवीस माझा सामना करु शकत नाहीत, असे ओवेसी यांनी म्हटलं होतं. 


देवेंद्र फडणवीस सातत्याने 'व्होट जिहाद', 'धर्मयुद्ध', असे शब्द बोलत असतात. हा निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही का? फडणवीस तुम्ही काही आमदार विकत घेतले, मग तुम्हाला चोर किंवा दरोडेखोर म्हणावे का? महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असताना ते रोखण्याची तुमची हिंमत झाली नाही का? फडणवीस तुम्हाला औरंगाबादला जे आणायचं आहे ते येणार नाही. देवेंद्र फडणवीसांच्या तोंडातून मनोज जरांगे यांचं नाव निघेल का? ते नेहमी 'जिहाद' 'जिहाद' बोलत असतात, अशी टीका ओवेसी यांनी केली.


ही बातमी वाचा: