Maharashtra MLC Election LIVE : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान, आतापर्यंत किती टक्के मतदान?

Maharashtra MLC Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती या पदवीधर तसंच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Jan 2023 04:13 PM
Thackeray Group Vs Shinde Group: ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाचा लेखी युक्तिवाद सादर

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाचा लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला आहे. तसेच कुठल्याही पातळीवर तपासलं तरी न्यायाची बाजू आमची, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.   

विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; दुपारी दोनपर्यंत 60.48 टक्के मतदान

Teachers Constituency Election Nagpur : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी विभागातील सहा जिल्ह्यात दुपारी दोनपर्यंत 60.48 टक्के मतदान झाले आहे. यात गडचिरोली येथे दुपारी एकवाजतापर्यंत 69.60 टक्के मतदान झाले होते. तर आतापर्यंतच्या प्राप्त आकडेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले आहे. विभागातील इतर जिल्ह्यातील आकडेवारी खालील प्रमाणे नागपूर 52.75 टक्के, वर्धा 67.06 टक्के, चंद्रपूर 69.06 टक्के, भंडारा 63.58 टक्के, गोंदिया 57.18 टक्के मतदान झाले आहे.

Amravati Graduate Constituency Election : अमरावती शहरात शेवटच्या तासात मतदानासाठी गर्दी, दुपारी 2 वाजेपर्यंत अमरावती विभागात 30.40 टक्के मतदान

Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अमरावती शहरात शेवटच्या तासात मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत अमरावती विभागात 30.40 टक्के मतदान झालं.

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यात दुपारी 2 वाजेपर्यंत 31.71 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान धुळ्यात

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यात दुपारी 2 वाजेपर्यंत 31.71 टक्के मतदान झालं. सर्वाधिक मतदान धुळे जिल्ह्यात झालं.


- सर्वाधिक 34.05 टक्के मतदान धुळे जिल्ह्यात
- नगर जिल्ह्यात 32.55 टक्के, 
- नंदुरबार जिल्ह्यात 31.73 टक्के
- नाशिक जिल्ह्यात 29.91 टक्के, 
- जळगाव जिल्ह्यात 30.93 टक्के

Amravati Graduate Constituency Election : अकोट शहर पोलिसांनी 54 लाख रुपयांची रक्कम पकडली, व्यापाऱ्याची रक्कम असल्याचं पोलीस तपासात समोर

Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांनी काल रात्री 54 लाख रुपयांची रक्कम पकडली आहे. पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीदरम्यान एका चारचाकी वाहनात ही रक्कम आढळली. संबंधित रक्कम ही वाडेगाव येथील एका ब्लँकेट, बेडशीटचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची असल्याचं पोलीस चौकशीत स्पष्ट झालं आहे. या व्यापाऱ्याने आज सकाळी बिलं सादर केल्यानंतर पोलिसांनी रक्कम मालकाच्या स्वाधीन केली आहे. या प्रकरणावर पोलिसांनी 'इन कॅमेरा' बोलणं टाळलं.

Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार उपेंद्र पाटील यांनी बनियानवरच केले मतदान

Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर मतदारसंघांची निवडणूक आज पार पडत आहे. वाशिममधील मानोरा तालुक्यात दोन ठिकाणी मतदान केंद्र आहेत. अपक्ष उमेदवार उपेंद्र पाटील यांनी येथील मासुपा कॉलेजमधील मतदान केंद्रात येऊन बनियानवरच मतदान केले आहे. पदवीधरांच्या मागण्यांसाठी आणि विनाअनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान मिळावे, जुनी पेंशन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी शर्ट काढून बनियानवर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रचार सुद्धा बनियानवर करुन आज मतदान सुद्धा बनियानवर केले आहे. त्यामुळे या उमेदवाराची सर्वत्र चर्चा होत आहे.



Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार उपेंद्र पाटील यांनी बनियानवरच केले मतदान

Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर मतदारसंघांची निवडणूक आज पार पडत आहे. वाशिममधील मानोरा तालुक्यात दोन ठिकाणी मतदान केंद्र आहेत. अपक्ष उमेदवार उपेंद्र पाटील यांनी येथील मासुपा कॉलेजमधील मतदान केंद्रात येऊन बनियानवरच मतदान केले आहे. पदवीधरांच्या मागण्यांसाठी आणि विनाअनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान मिळावे, जुनी पेंशन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी शर्ट काढून बनियानवर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रचार सुद्धा बनियानवर करुन आज मतदान सुद्धा बनियानवर केले आहे. त्यामुळे या उमेदवाराची सर्वत्र चर्चा होत आहे.



Aurangabad Teacher Constituency Election : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दुपारी दोन वाजेपर्यंत 58.27 टक्के मतदान

Aurangabad Teacher Constituency Election : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दुपारी दोन वाजेपर्यंत 58.27 टक्के मतदान झालं आहे. सर्वाधिक मतदान हिंगोली जिल्ह्यात झाल आहे.



Nagpur Teacher Constituency Election : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व सहा जिल्ह्यात दुपारी 12 वाजेपर्यंत सरासरी 35 टक्के मतदान

Nagpur Teacher Constituency Election : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व सहा जिल्ह्यात दुपारी 12 वाजेपर्यंत सरासरी 35 टक्के मतदान झालं आहे. सर्वाधिक 42 टक्के मतदान चंद्रपुरात झालं असून सर्वात कमी 29 टक्के मतदान नागपूर जिल्ह्यात झालं आहे.

Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधरसाठी आतापर्यंत 17.20 टक्के मतदान

Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर मतदान प्रक्रियेला आज सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली असून बारा वाजेपर्यंत नाशिक विभागात जवळपास 17.20 टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच जवळपास 45 हजार 186 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.


 

Nashik Graduate Constituency Election : सत्यजीत तांबे हे संगमनेरमधील मतदारसंघावर मतदान केंद्रावर दाखल

Nashik Graduate Constituency Election : अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे संगमनेरमधील मतदारसंघावर मतदान करण्यासाठी पोहोचले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दुपारी 12 वाजेपर्यंत 17.20 टक्के मतदान

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आतापर्यंत 45 हजार 186 मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. 12 वाजेपर्यंत 17.20 टक्के मतदान झालं.


- अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 18.84 टक्के मतदान  


- नंदुरबार जिल्ह्यात 17.54 टक्के,


- नाशिक जिल्ह्यात 17.47 टक्के


-  जळगाव जिल्ह्यात 14.09 टक्के


- धुळ्यात 12.72 टक्के मतदानाची नोंद


 

Nagpur Teacher Constituency Election : सकाळी दहा वाजेपर्यंत भंडाऱ्यात 13.12 टक्के आणि गोंदिया 11.83 टक्के मतदान

Nagpur Teacher Constituency Election : विधानपरिषदेच्या नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सकाळी दहा वाजेपर्यंत झालेलं मतदान


भंडारा : 13.12 टक्के


गोंदिया : 11.83 टक्के

Konkan Teacher Constituency Election : सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून 2164  शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार

Konkan Teacher Constituency Election : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात 19 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया वेळात होणार आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून 2164  शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील विरुद्ध भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात खरी लढत आहे. तर शिक्षक भारतीचे धनाची पाटील हे सुद्धा नशिब आजमावत आहेत. एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत.

Nashik Graduate Constituency Election : विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही मतदानाचा हक्क बजावला

Nashik Graduate Constituency Election : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. या संपूर्ण निवडणुकीची प्रशासन म्हणून ज्यांच्यावर मुख्य जबाबदारी आहे, ज्यांच्या देखरेखखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडतेय त्या विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज सकाळी मतदान केलं. गंगापूर रोडवरील महापालिकेच्या 18 क्रमांकाच्या शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Nashik Graduate Constituency Election : आधी मतदान, नंतर अंगाला हळद; तरुणाने मतदानाचा हक्क बजावला

Nashik Graduate Constituency Election : नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिकरोड परिसरातील स्वनील कराड या तरुणाचे उद्या लग्न असून आज अंगाला हळद लावण्याआधी मतदान करण्यास त्याने प्राधान्य दिलं. सकाळी नाशिकरोड परिसरातील महापालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन त्याने आपला मतदानाचा हक्क बजावला.

Konkan Teacher Constituency Election : शिक्षक दाम्पत्याने बाळासह बजावला मतदानाचा हक्क, अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात शिक्षक दाम्पत्याचं मतदान

Konkan Teacher Constituency Election : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एका शिक्षक दाम्पत्याने आपल्या लहान बाळाला कडेवर घेऊन मतदानाचा हक्क बजावला. अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात या शिक्षक दाम्पत्याने मतदान केलं. अंबरनाथमध्ये राहणारे कविता आणि शशिकांत मडिवाल या शिक्षक दाम्पत्याने आज आपल्या लहान बाळाला सोबत घेत मतदानाचा हक्क बजावला. कविता या पिंपळास इथल्या सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांचे पती शशिकांत मडिवाल हे अंबरनाथच्या कन्नड माध्यमाच्या शाळेत शिक्षक आहेत. या दोघांनी आज आपल्या चिमुकलीला कडेवर घेत अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात मतदानाचा हक्क बजावला. चिमुकलीला सांभाळायला घरी कोणी नसल्याने तिला घेऊन मतदानाला आल्याचं या दोघांनी सांगितलं. मात्र यामुळे या चिमुकलीला मतदानाचा हक्क बजावण्याचं बाळकडू मिळाल्याची चर्चा मतदान केंद्रावर रंगली होती.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत 11.14 टक्के मतदान

Marathwada Teacher Constituency Election: मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी सकाळी 10 वाजेपर्यंत 11.14  टक्के मतदान झाले आहे. ज्यात 1154 महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून, 5721 पुरुष मतदार असे एकूण 6875 मतदारांनी आतापर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. ज्यात 7.83 स्त्री आणि 12.18 पुरुष असे एकूण 11.14 टक्के मतदान झाले आहे. 

Teachers Constituency Election: नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात दोन तासांत 13.54 टक्के मतदान

Teachers Constituency Election Nagpur Division : विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणूकीत सहा जिल्ह्यात आज दोन तासांत 13.54 टक्के मतदान झाले आहे.

Graduate Constituency election: अमरावती विभागात दोन तासांत 5.49 टक्के मतदान

Graduate Constituency Election Amravati  Division: अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदान सुरु झाले असून दोन तासांत विभागात फक्त 5.49 टक्के मतदान झाले आहे.

Teachers Constituency Election: चंद्रपूर जिल्ह्यात दोन तासांत 17.29 टक्के मतदान

Teachers Constituency Election Nagpur Division : विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील चंद्रपूर जिल्ह्यात सकाळी 8 ते 10 या वेळेत 17.29 टक्के मतदान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 7571 मतदार असून 27 मतदान केंद्रांवर मतदान सुर आहे.

Teachers Constituency Election: गोंदिया जिल्ह्यात दोन तासांत 11.83 टक्के मतदान

Teachers Constituency Election Nagpur Division : विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील गोंदिया जिल्ह्यात सकाळी 8 ते 10 या वेळेत 11.83 टक्के मतदान झाले आहे.

Teachers Constituency Election: भंडारा जिल्ह्यात दोन तासांत 12.86 टक्के मतदान

Teachers Constituency Election Nagpur Division : विधान परिषदेच्या निवडणुकीत भंडारा जिल्ह्यात सकाळी 8 ते 10 या वेळेत 13.12 टक्के मतदान झाले आहे.

Teachers Constituency Election: गडचिरोली जिल्ह्यात दोन तासांत 12.86 टक्के मतदान

Teachers Constituency Election Nagpur Division : विधान परिषदेच्या निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात सकाळी 7 ते 9 या दोन तासात 12.86% मतदान झाले आहे. नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी निवडणूक आयोगाने सकाळी सात ते दुपारी तीन पर्यंत मतदानाची वेळ केली आहे. या ठिकाणचे मतदान तीन वाजता संपेल.

Konkan Teacher Constituency Election : पनवेलमधील मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळ, मतदान केंद्र कर्मचाऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप

Konkan Teacher Constituency Election : पनवेलमधील मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळ उडाला. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. परंतु मतदान केंद्र कर्मचाऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला. मतदारांची दिशाभूल करत असल्याचा महाविकास आघाडीने आरोप केला. मतदान केंद्र कर्मचाऱ्याला बाहेर काढले.

Amravati Graduate Constituency Election : नाशिक विभागात पहिल्या दोन तासात साधारणपणे तीन ते साडेतीन टक्के मतदान

Amravati Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्या दोन तासात साधारणपणे तीन ते साडेतीन टक्के मतदान नाशिक विभागात झालं. अहमदनगर जिल्ह्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नागपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराबद्दल नागो गाणार यांच्या बुथ एजंटने घेतला आक्षेप

Nagpur Teachers Constituency Election: नागपुरातील शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदानादरम्यान मोहोता महाविद्यालयात मतदान केंद्रात पक्षाची टोपी आणि स्कार्फ परिधान केल्याबद्दल महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या कृतीवर नागो गाणारच्या बुथ एजंटने आक्षेप घेतला आहे.

Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर भाजपचे उमेदवार डॉ रणजीत पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर भाजपचे उमेदवार डॉ रणजीत पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल (29 जानेवारी) अमरावतीच्या महेश भवनमध्ये मेळावा आयोजित केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. निवडणुकीच्या 48 तासात प्रचार करता येत नाही. तरीही डॉ रणजित पाटील यांनी काल महेश भवनच्या आत बंद हॉलमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. आचारसहिता भंग केल्याने अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात डॉ रणजित पाटील आणि महेश भवनचे कार्यकारणी सदस्यांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे


 

Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यातील एकूण 26 मतदान केंद्रावर मतदान

Amravati Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे. वाशिम जिल्ह्यातील एकूण 26 मतदान केंद्रावर या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील 18 हजार 50 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 13 हजार 333 पुरुष मतदार, 4 हजार 715 स्त्री मतदार आणि 2 इतर मतदारांचा समावेश आहे. 

Konkan Teacher Constituency Election : रत्नागिरीत कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाला चांगला प्रतिसाद

Konkan Teacher Constituency Election : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाला रत्नागिरी जिल्ह्यातही सुरुवात झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 17 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 4120 मतदार यंदा मतदान करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या मतदानाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Konkan Teacher Constituency Election : अंबरनाथमध्ये कोकण शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात, भाजप-शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे सुद्धा इथेच मतदान करणार

Konkan Teacher Constituency Election : अंबरनाथमध्ये कोकण शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. शिक्षक सकाळी 8 वाजल्यापासून अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात मतदान करत आहेत. याच मतदान केंद्रावर भाजप-शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे सुद्धा मतदान करणार आहेत.

Nashik Graduate Constituency Election : नंदुरबार जिल्ह्यातल्या 19 मतदान केंद्रांवर 18 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात झाली असून नंदुरबार जिल्ह्यातल्या 19 मतदान केंद्रांवर अठरा हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित माजी मंत्री के सी पाडवी. खासदार हिना गावित यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. 

Nashik Graduate Constituency Election : अहमदनगरच्या लोणी गावात नोकरीवर जाण्यापूर्वी अनेकांनी मतदान केलं

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदार संघासाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच अनेक मतदान केंद्रांवर उत्स्फूर्त प्रतिसाद मतदार देताना दिसत आहेत. राहता तालुक्यातील लोणी या गावात सकाळपासूनच मतदारांनी मोठी गर्दी केली असून अनेक मतदार हे नोकरदार असल्याने नोकरीवर जाण्यापूर्वी ते आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे विरुद्ध महाविकास आघाडीच्या पाठिंबाच्या वर उभ्या असलेल्या शुभांगी पाटील यांच्यात महत्त्वाची लढत होत आहे. आज होणाऱ्या मतदानात नेमकं मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे 

Nagpur Teacher Constituency Election : 124 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात, यंदा चांगल्या मतदानाची अपेक्षा

Nagpur Teacher Constituency Election : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील सर्व 124 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात 39 हजार 393 मतदार असून नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या पाच जिल्ह्यात सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान होणार आहे. नागपूरच्या अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच शिक्षकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे यंदा चांगलं मतदान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षक मतदारसंघात पसंती क्रमांकानुसार मतदान करायचे असून निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या जांभळ्या रंगाच्या पेनाने उमेदवारांसमोर पसंती क्रमांक द्यायचे आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला मतदान करायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने ही अनेक मतदान केंद्रांसमोर रांगा दिसून येत आहे.

Nashik Graduate Constituency Election : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मतदानाचा हक्क बजावला

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मतदानासाठी केंद्रावर रांगा

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत. 16 उमेदवार असल्याने जम्बो मतपत्रिका आहे, सुशिक्षित मतदार असल्याने बेरोजगारीची समस्या सोडवावी, उद्योग वाढावेत अशी अपेक्षा मतदारराजा व्यक्त करत आहे.

Aurangabad Teacher Constituency Election : उस्मानाबादमधील मतदान केंद्रावर शिक्षकांची सकाळपासूनच गर्दी

Aurangabad Teacher Constituency Election : मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे आज मतदान होत असून उस्मानाबादमधील जिल्हा परिषद कन्या प्रशाला या मतदान केंद्रावर शिक्षकांनी मतदानासाठी चांगली गर्दी केली. आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी शिक्षकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लावल्या असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी हे चोक बंदोबस्त लावला आहे.

Nashik Graduate Constituency Election : महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शुभांगी पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना आपला विजय निश्चित होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Nashik Graduate Constituency Election : मतदान करण्यासाठी आलेल्या शुभांगी पाटील यांचा मतदान क्रमांक सापडत नसल्याने काही काळ गोंधळ

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले. यानंतर शुभांगी पाटील धुळ्यातील महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक आठ इथे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्या असता, त्या ठिकाणी मात्र त्यांचा मतदान क्रमांक सापडत नसल्याने बराच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Amravati Graduate Constituency Election : भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांचं अकोल्यात सपत्नीक मतदान

Amravati Graduate Constituency Election : अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांनी अकोल्यात सपत्नीक मतदान केलं. शहरातील आरडीजी महिला महाविद्यालयातील मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. डॉ. रणजीत पाटील यांना मविआच्या धीरज लिंगाडे यांचं आव्हान आहे.

Aurangabad Teacher Constituency Election : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात, भाजप उमेदवार किरण पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला

Aurangabad Teacher Constituency Election : मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मराठवाड्यातले आठही जिल्ह्यातील 61 हजार शिक्षक आज आपला आमदार निवडणार आहेत. यासाठी 227 मतदान केंद्रावर मतदान सुरु झालं असून 14 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाचे उमेदवार किरण पाटील यांनी तहसील कार्यालयातील मतदान केंद्रामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.

Nagpur Teacher Constituency Election : गळाभेट घेत सुधाकर अडबाले आणि नागो गाणार यांच्या एकमेकांना शुभेच्छा

Nagpur Teacher Constituency Election : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे दोन्ही प्रमुख उमेदवार म्हणजेच सुधाकर अडबाले आणि नागो गाणार मोहता सायन्स महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर एकत्रित आले. दोघांनी गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील प्रवासाला निघाले. सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा तर नागो गाणार यांना भाजपचा पाठिंबा आहे.

Nagpur Teacher Constituency Election : आम्हाला विजयाचा पूर्ण विश्वास : सुधाकर अडबाले

Nagpur Teacher Constituency Election : विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचे सुधाकर अडबाले यांनी सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांना भेटी देणं सुरु केलं आहे. मतदान सुरु होताच त्यांनी नागपूरच्या मोहता सायन्स कॉलेज इथल्या मतदान केंद्रावर हजेरी लावली. महाविकास आघाडीने अखेरच्या क्षणी पाठिंबा जाहीर केला असला तरी आम्ही सहाही जिल्ह्यात मतदार शिक्षकांपर्यंत पोहोचू शकलो, त्यामुळे आमचा प्रचार चांगला झाला आहे. आम्हाला विजयाचा पूर्ण विश्वास आहे, असे अडबाले म्हणाले. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या मतांमध्ये कुठेही मत विभाजन होणार नाही. या मतदारसंघात चुरस फक्त विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचे सुधाकर अडबाले आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांच्यात असल्याचा त्यांचा दावा आहे, असं सुधाकर अडबाले म्हणाले.

Nashik Graduate Constituency Election : सत्यजीत तांबे कुटुंबासह मतदानाला उपस्थित

Nashik Graduate Constituency Election : नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सत्यजीत तांबे कुटुंबासह मतदानाला हजर झाले आहेत. त्यांच्यासोबत वडील सुधीर तांबे, आई दुर्गा तांबे आणि पत्नी मैथिली मतदानासाठी आले आहेत.

Konkan Teacher Constituency Election :  कोकण शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे आणि बाळाराम पाटील यांच्यात लढत, एकूण 40 हजार मतदार

Konkan Teacher Constituency Election : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 8 वाजता मतदान सुरु होणार आहे. भाजपा-शिंदे गटाकडून ज्ञानेश्वर म्हात्रे तर महाविकास आघाडीकडून बाळाराम पाटील रिंगणात आहेत. या दोघांमध्ये थेट लढत होईल. या मतदारसंघात एकूण 40 हजार मतदार आहेत. एकूण 86 मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडेल. या मतदारसंघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Nashik Graduate Constituency Election : नाशिकमध्ये थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाला 8 वाजता सुरुवात होणार आहे. पोलिंग एजंटच्या समक्ष मतपेटी सील केली जाणार, त्यानंतर मतदानाला सुरुवात होईल.

पार्श्वभूमी

Maharashtra MLC Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी (Graduate And Teacher Constituency Election) आज (30 जानेवारी) मतदान होणार आहे. यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. मतदारांना सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. 2 दोन फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे.


महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप-शिंदे गट असा थेट सामना पुन्हा एकदा रंगणार आहे. नाशिक आणि नागपूर इथल्या मतदारसंघांमध्ये चुरस वाढली आहे. पहिल्या दिवसांपासून ते आतापर्यंत नाशिक मतदारसंघात नवनव्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवाय नागपूर शिक्षक मतदारसंघही अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. त्यामुळे पाच जागांसाठी होणाऱ्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता या मतदारसंघात कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे.


नाशिक पदवीधर मतदारसंघ


विधानपरिषदेच्या पाच जागांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली आणि सगळ्याचं लक्ष असलेली निवडणूक म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची. काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या सुधीर तांबे यांनी अर्ज मागे घेतला आणि त्याच वेळी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसने सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांची पक्षातून हकालपट्टी केली. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघ


नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या समर्थनाने विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचे सुधाकर अडबाले मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासमोर भाजप प्रणित आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांचं आव्हान आहे. 


अमरावतीमध्ये पदवीधर मतदारसंघ


अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेस लढवत असून धिरज लिंगाडे हे रिंगणात आहेत. या पदवीधर मतदारसंघात भाजप, शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) आणि रिपाइं (आठवले गट) युतीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे. 


कोकण शिक्षक मतदारसंघ


महाविकास आघाडीकडून शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. इथे भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. 


औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ


औरंगाबात शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप सामना पाहायला मिळेल. गेली कित्येक वर्षे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे यावेळी देखील हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून देखील हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या किरण पाटील यांना भाजपकडून रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर विक्रम काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत.


कोणामध्ये प्रमुख लढत?


कोकण शिक्षक मतदारसंघ


बाळाराम पाटील (शेकाप)
ज्ञानेश्वर म्हात्रे ( भाजप)


औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ


विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
किरण पाटील (भाजप)


नाशिक पदवीधर मतदारसंघ


शुभांगी पाटील (अपक्ष)
सत्यजीत तांबे (अपक्ष)
धनराज विसपुते (अपक्ष)
धनंजय जाधव (अपक्ष)


नागपूर शिक्षक मतदारसंघ


सुधाकर अडबाले (मविआ पाठिंबा)
नागो गाणार (भाजप पाठिंबा)


अमरावती पदवीधर मतदारसंघ


धीरज लिंगाडे (मविआ - काँग्रेस)
डॉ. रणजित पाटील (भाजप)


संबंधित बातमी


Teacher Graduate Constituency : शिक्षक, पदवीधरमधून आमदार नेमके कसे निवडतात? कशी असते निवडणूक प्रक्रिया? 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.