North Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) आता हाती येत आहे. देशात कुणाची सत्ता येणार? याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. तर राज्यातल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली आहे. उत्तर महाराष्ट्रदेखील महायुतीला धक्का बसला आहे. उत्तर महाराष्ट्रात महायुतीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर महाविकास आघाडीने सहा जागांवर कब्जा केला आहे. 2019 सालच्या निवडणुकीत भाजपला सहा जागा तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या होत्या. 

Continues below advertisement

महाराष्ट्रात महायुतीत भाजपने सर्वाधिक 23 जागा लढवल्या. यापाठोपाठ शिंदे गटाने 15 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने 4 जागा लढवल्या आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये शिस्वेना ठाकरे गटाने सर्वाधिक 21 जागा लढवल्या. यापाठोपाठ काँग्रेसने 17 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या आहेत. यातील उत्तर महाराष्ट्राच्या जागांचा निकाल आता समोर आला आहे. 

उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख लढती 

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, दिंडोरी, जळगाव, नंदुरबार, रावेर, शिर्डी, अहमदनगर, धुळे हे आठ लोकसभा मतदारसंघ आहेत. नाशिकमधून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्या प्रमुख लढत झाली होती. तर दिंडोरी लोकसभेत भाजपच्या डॉ. भारती पवार आणि शरद पवार गटाचे भास्कर भगरे अशी लढत झाली.  जळगाव लोकसभेत भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार, नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी, रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे आणि शरद पवार गटाचे श्रीराम पाटील, शिर्डी लोकसभेत शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, अहमदनगरमध्ये भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत झाली. तर धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. 

Continues below advertisement

उत्तर महाराष्ट्रात 'या' उमेदवारांनी मारली बाजी

उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर कोण बाजी मारणार याबाबत टीव्ही नाईन पोलस्ट्राटने अंदाज वर्तवला आहे. तो पुढीलप्रमाणे...

मतदार संघ  उमेदवार आणि पक्ष

विजयी उमेदवार

नाशिक 

हेमंत गोडसे - शिवसेना शिंदे गट (महायुती)

राजाभाऊ वाजे - शिवसेना ठाकरे गट (महाविकास आघाडी)

शांतीगिरी महाराज - अपक्ष

राजाभाऊ वाजे 
दिंडोरी

भारती पवार - भाजप (महायुती)

भास्कर भगरे - राष्ट्रवादी शरद पवार गट (महाविकास आघाडी)

भास्कर भगरे 
धुळे 

डॉ. सुभाष भामरे - भाजप (महायुती)

डॉ. शोभा बच्छाव - काँग्रेस (महाविकास आघाडी)

डॉ.  शोभा बच्छाव 
शिर्डी 

सदाशिव लोखंडे - शिवसेना शिंदे गट (महायुती)

भाऊसाहेब वाकचौरे - शिवसेना ठाकरे गट (महाविकास आघाडी)

भाऊसाहेब वाकचौरे
जळगाव

स्मिता वाघ - भाजप (महायुती)

करण पवार - शिवसेना ठाकरे गट (महाविकास आघाडी)

स्मिता वाघ 
नंदुरबार

हिना गावित - भाजप (महायुती)

गोवाल पाडवी - काँग्रेस (महाविकास आघाडी)

गोवाल पाडवी
रावेर 

रक्षा खडसे - भाजप (महायुती)

श्रीराम पाटील - राष्ट्रवादी शरद पवार गट (महाविकास आघाडी)

रक्षा खडसे
अहमदनगर 

डॉ. सुजय विखे पाटील - भाजप   (महायुती)

निलेश लंके - राष्ट्रवादी शरद पवार गट (महाविकास आघाडी)

निलेश लंके

आणखी वाचा 

तुमचा खासदार कोण? एका क्लिकवर जाणून घ्या 48 विजयी उमेदावारांची नावे!