Riteish Deshmukh :  अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या निर्णायक महाराष्ट्रातले कल आता समोर यायाला लागले आहेत. यामध्ये लोकसभेच्या अनेक निर्णयाक जागांवर धक्कादायक असे कल समोर आलेत. महायुतीचं आव्हान मोडीत काढत अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. तर काही उमेदवारांनी त्यांचा विजय निश्चित देखील झालाय. याचदरम्यान अभिनेता रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 


रितेशने एक्स पोस्ट करत या निवडणुकांच्या निकालावर अगदी एका वाक्यात भाष्य केलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिवगंत नेते विलासराव देशमुख यांचे सुपुत्र असूनही रितेश राजकारणात सक्रिय नाही. पण विलासराव देशमुखांचे दोन सुपुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे राजकारणात सक्रिय असून आमदार देखील आहेत. त्यामुळे यंदाच्या लोकसभेच्या रिंगणात देखील देशमुखांचं कुटुंब देखील उतरलं होतं. 


रितेशने काय म्हटलं?


रितेशने एक्स पोस्ट केली असून त्यामध्ये त्याने ईव्हीएमवर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, EVM - Every Vote Matters अशी प्रतिक्रिया समोर आली आहे. रितेशच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. दरम्यान त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर देखील बरीच चर्चा सुरु आहे.  






काँग्रेसचे उमेदवार रिंगणात


दरम्यान देशमुखांचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमध्ये काँग्रेसचे शिवाजीराव काळगे रिंगणात होते. त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे अनेक मातब्बर उमेदवार प्रचाराच्या रिंगणात उतरले होते. तसेच मराठवाड्यतील अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या आणि महाविकासआघाडीच्या उमेदवारांनी देखील कंबर कसली. 


ही बातमी वाचा : 


Lok Sabha Result 2024 : 'ड्रीम गर्ल' विजयाच्या 'ड्रीम' हॅट्रीकचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेवर, हेमा मालिनींची मथुरेतून लाखोंच्या मतांनी आघाडी