Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे. तर त्यानंतर देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्रही स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या समोर आलेला मतदानाचा कल लक्षात घेता राज्यातल्या लोकसभा महालढतीचे अपेडेट्स क्षणाक्षणाला बदलताना दिसत आहे. अशातच विदर्भातील महायुतीला काहीसा धक्का बसताना दिसत आहे. विदर्भात सध्याघडीला महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे. 


विदर्भात  (Vidarbha) महाविकस आघाडीने 7 ठिकाणी आघाडीवर आहे. तर महायुती अवघ्या 2 ठिकाणी आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे पश्चिम विदर्भातील महत्वाची जागा असलेल्या चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे सुरवातीपासून पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. तर दाहव्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर तब्बल 1 लाख 6112 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर रामटेक लोकसभा मतदारसंघात आठव्या  फेरीनंतर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 44, 422 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजू पारवे हे पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.


विदर्भात महायुतील फटका? 


तसेच गडचिरोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नामदेव किरसान 29776 मतांनी आघाडीवर आहे. तर दुसरीकडे नागपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 47, 146 मतांनी आघाडी कायम ठेवली आहे. त्यामुळे विदर्भात मतमोजणीमध्ये दुपारपर्यंत महाविकास आघाडीला कुठेतरी यश येताना दिसत आहे. 


अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे 1955 मतांनी आघाडीवर आहेत. तर पंधराव्या फेरीत धोत्रेंनी पुन्हा मुसंडी घेतलीय. सध्या या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपात काट्याची टक्कर आहे. काँग्रेसचे डॉ. अभय पाटील सध्या दुसऱ्या द क्रमांकावर आहे. तर वंचितचे प्रकाश आंबेडकर मोठ्या मतांनी पिछाडीसह तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे. प्रकाश आंबेडकर हे भाजपपेक्षा तब्बल 1 लाख 12 हजार मतांनी पिछाडीवर आहे. तर दुसरीकडे विदर्भातील हॉट सीट समजल्या जाणाऱ्या अमरावती मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी 15, 665 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे अमरावती मध्ये देखील कल क्षणाक्षणाला बदलताना दिसत आहे.


सर्वत्र आमची हवा - डॉ. नितीन राऊत


मतमोजणीतील आतापर्यंतच्या कलानुसार महाविकास आघाडीला विदर्भ, मुंबई, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रसह सर्वच विभागांत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. तसेच देशात इंडिया आघाडीची तर राज्यात महाविकास आघाडीची हवा सुरु असल्याचे मत माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे. काही तासातच लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येतील. यात भाजपला जबरदस्त धक्का लागल्याचे चित्र आपण बघणार आहोत. भाजपची झालेली घसरण देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारी आहे. आमचे नेते राहुलजी गांधी हे केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोनही लोकसभा जागांवरून चांगल्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. यावेळी आमचा विजय निश्चित होईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या