शिरुर, पुणे :  पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदार संघात अजित पवारांना (Shirur Loksabha Election Result 2024) मोठा धक्का बसताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे आणि महायुतीचे आढळराव पाटील अशी लढत होती. त्यात आता अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. सातव्या फेरी अखेर अमोल कोल्हे ( Amol kolhe)53949  मतांनी आघाडीवर आणि शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहे. त्यात आला अमोल कोल्हेंच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि सेलेब्रेशनला सुरुवात झाली आहे.  अमोल कोल्हेंच्या घरी कार्यकर्ते येऊ लागले. खासदारकीचा डबल बार होणार असल्यानं कार्यकर्ते कोल्हेना शुभेच्छा देण्यास गर्दी करू लागलेत.


शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांना लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा मतदारसंघात मोठं मताधिक्य मिळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आंबेगाव, शिरूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून मोठा जल्लोष पुणे नगर महामार्गावर केला आहे.


घरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी...


अमोल कोल्हेंच्या घरासमोर आणि मतदार संघात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे. त्यात अनेक कार्यकर्ते अमोल कोल्हेंना पेठे भरवण्यासाठी पोहचले आहेत. कुटुंबीय आणि कार्यकत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील काहीच तासात निकालाचं संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. 


अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला


राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शिरुरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अर्थाच अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत होती. त्यात अजित पवारांनी शिरुर लोकसभा जिंकण्याचा चंग बांधला होता आणि आढळराव पाटलांचा शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन त्यांना उमेदवारी दिली होती. शिरुरमध्ये आढळराव पाटील यांना जिंकून आणण्यासाठी अजित पवारांनी मोठे प्रयत्न केले. यावेळी प्रचारादरम्यान थेट टीका करण्यात आली. कांद्याच्या प्रश्नावरुन टीका करण्यात आली. आता मात्र आढळराव पाटील हे पिछाडीवर दिसत आहे. त्यामुळे शिरुरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता दिसत आहे. 


शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या निरगुडसर या गावात आघाडी मिळाली.आपल्या गावात प्रतिस्पर्धी उमेदवाराला मताधिक्य  मिळाल्याने मंत्री वळसे पाटील यांना हा मोठा धक्का समजला जातो. बाराव्या फेरीअखेर डॉ. कोल्हे अंदाजे 60 हजार मतांनी पुढे आहेत.