Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे. तर त्यानंतर देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्रही स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या समोर आलेल्या कल लक्षात घेता राज्यातल्या लोकसभा महालढतीचे अपेडेट्स क्षणाक्षणाला बदलताना दिसत आहे. अशातच विदर्भात (Vidarbha) महायुतीला काहीसा धक्का बसताना दिसत आहे. विदर्भात सध्याघडीला महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे. विदर्भात महाविकस आघाडी 6 ठिकाणी आघाडीवर आहे. तर महायुती 4 ठिकाणी पुढे आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.


विशेष बाब म्हणजे पश्चिम विदर्भातील महत्वाची जागा असलेल्या चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे सुरवातीपासून  पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. तर चौथ्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर तब्बल 32,468 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर रामटेक लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरीनंतर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 16,200 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजू पारवे हे पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. तसेच गडचिरोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नामदेव किरसान 5,217 मतांनी आघाडीवर आहे. त्यामुळे विदर्भात मतमोजणीमध्ये सकाळी दहा 11 वाजेपर्यंत महाविकास आघाडीला कुठेतरी यश येताना दिसत आहे.  


विदर्भात कोणाला धक्का? कोणाची सरशी?


नागपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिसऱ्या फेरीअखेर 32 हजार 580 मतांनी आघाडीवर आहेत. नितिन गडकरी यांना आता पर्यंत 1 लाख 16 हजार 600 मत मिळाले आहेत.  तर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे सुरवातीपासून पिछाडीवर आहे.


गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अशोक नेते (भाजप) पिछाडीवर आहे. तर काँग्रेसचे नामदेव किरसान 8853 मतांनी आघाडीवर आहे.


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे पाचव्या फेरीतही पिछाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर तब्बल 42, 182 हजार मतांनी आघाडीवर आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर असल्याचे बघायला मिळाले आहे. यात मात्र काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांनी एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. काँग्रेसचे डॉ. अभय पाटील सहाव्या फेरी अखेरीस  5693 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे अनुप धोत्रे दुसर्या क्रमांकावर असून वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर मोठ्या पिछाडीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 


भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघात बाराव्या फेरीत महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे 81493 मते घेत आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे 73903 मत घेत पिछाडीवर आहे.


रामटेक लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरीनंतर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 16,200 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजू पारवे हे पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.


वर्धा  लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे 9146 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे रामदास तडस 76974 मत घेत पिछाडीवर आहे.


यवतमाळ-वाशिम मतदारसंघात सातव्या फेरीत काँग्रेसचे संजय देशमुख यांनी 1,56,253 मते घेऊन 32,213 मतांनी आघाडी कायम ठेवली आहे. तर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील 1,24,040 मते घेत पिछाडीवर आहे.


इतर महत्वाच्या बातम्या