एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Maharashtra Exit Poll Results: मविआ आणि महायुतीमध्ये कांटे की टक्कर, लोकशाही-रुद्रच्या एक्झिट पोलमध्ये दोन्ही आघाड्या सत्तेजवळ

Maharashtra Exit Poll Results 2024: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात मतदान पार पडलं आहे. यानंतर विविध संस्थांच्या एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत.

Maharashtra Election Exit Polls Result 2024 मुंबई :महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सरासरी 58.45 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकशाही रुद्रच्या अंदाजानुसार महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.    

महाविकास आघाडी अन् महायुतीमध्ये कांटे की टक्कर

लोकशाही मराठी- रुद्र  यांच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दोन्ही आघाड्या सत्तेजवळ आहेत. कोणत्याही एका आघाडीला त्यांनी बहुमताच्या 144 जागांपेक्षा अधिक जागांचा अंदाज वर्तवला नाही. महायुतीला 142 जागांपर्यंत तर महाविकास आघाडीला 140 जागांजवळ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतरांच्या खात्यात 18 ते  23 जागा जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

लोकशाही मराठी-रुद्रच्या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्त्वातील महायुतीला 128-142 जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना 18 ते 23 जागा मिळू शकतात. 

लोकशाही रुद्र नुसार कुणाला किती जागा? (पक्षनिहाय अंदाज)

महायुती - 128-142
भाजप - 80-85
शिवसेना (शिंदे गट) - 30-35
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-22
महाविकास आघाडी - 125-140
काँग्रेस- 48-55
शिवसेना (ठाकरे गट) - 39-43
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 38-42
इतर - 18-23

महाराष्ट्रात कोण किती जागा लढलं?

महाराष्ट्रात महायुतीमध्ये भाजपनं 149 जागा लढवल्या होत्या. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 85 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 54 जागा लढवल्या होत्या. महाविकास आघाडीत काँग्रेसनं 101, शिवसेना ठाकरे पक्षानं 95 तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 87 जागा लढवल्या होत्या. 

प्रत्यक्ष मतमोजणी कधी ?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आज पार पडलं आहे.  आता विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी 23 नोव्हेंबरला पार पडणार आहे. 

 दरम्यान, विविध एक्झिट पोलच्या आकडेवारीचा अंदाज पाहिला असता बहुतांश पोल नुसार महायुतीचं सरकार राज्यात येऊ शकतं. तर, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. भाजपनं सर्वाधिक 149 जागा लढवल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक नुकसान सहन करावं लागू शकतं असं देखील एक्झिट पोलच्या अंदाजामधून दिसून येत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, अशी शक्यात एक्झिट पोलनं वर्तवली आहे. 

इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?Maharashtra Exit Poll 2024 | विधानसभा निवडणुकीचा Exit Poll, कुणाला किती जागा मिळणार? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Embed widget