एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: कोकणातील सर्वात शॉकिंग निकाल, दापोलीत रामदास कदमांचा मुलगा पडणार, प्रजातंत्रचा धक्कादायक एक्झिट पोल

Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: दापोलीत रामदास कदमांच्या मुलाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भरत गोगावले, बारामतीतून युगेंद्र पवार यांना धक्का बसणार असल्याचा अंदाज प्रजातंत्रच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Exit Poll: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष्य लागलं आहे. या निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांची आणि पक्षाची प्रतिष्ठापणाला लागली आहे. अशातच काही एक्झिट पोलनुसार काही नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामध्ये दापोलीत रामदास कदमांच्या मुलाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भरत गोगावले, बारामतीतून युगेंद्र पवार यांना धक्का बसणार असल्याचा अंदाज प्रजातंत्रच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे.

दापोली मतदारसंघामध्ये रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम (शिवसेना शिंदे गट) महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत, तर त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे संजय कदम हे उभे आहेत. प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार भरत गोगावले यांना देखील धक्का बसण्याची शक्यता आहे. महाड मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून स्नेहल जगताप (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध भरत गोगावले (शिवसेना शिंदे गट) अशी लढत होत आहे, यामध्ये स्नेहल जगताप यांच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 

तर दुसरीकडे राज्याचं लक्ष्य लागलेल्या बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार विरूध्द युगेंद्र पवार आहेत यामध्ये युगेंद्र पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. तर आमदारकीच्या विजयाची माळ ही अजित पवारांच्या गळ्यात पडणार असल्याची शक्यता प्रजातंत्रच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे.

प्रजातंत्रच्या एक्झिट पोलने दिलेल्या अदाजानुसार, यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 149 जागांवर विजय मिळेल. तर महायुतीला (Mahayuti) फक्त 127 जागा मिळू शकतात. या शक्यतेनुसार जागा मिळाल्यास महाविकास आघाडीला बहुमतासाठी लागणारा 145 जागांचा आकडा पार करुन सरकार स्थापन करु शकते. प्रजातंत्रच्या एक्झिट पोलमध्ये मतदारसंघ निहाय निकालाचे अंदाजही व्यक्त करण्यात आले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अहेरीतून धर्मरावबाबा अत्राम, अंधेरी पूर्व मतदारसंघातून मुरजी पटेल, बारामतीतून अजित पवार यांचा विजय पक्का मानला जात आहे. आता हे अंदाज खरे ठरणार की बड्या नेत्यांना धक्का बसणार हे, 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.

प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार राज्यातील कोणते 32 उमेदवार विजयी होणार?

कोपरी-पाचपाखाडी - एकनाथ शिंदे, शिवसेना
द. प. नागपूर - देवेंद्र फडणवीस, भाजप
बारामती - अजित पवार, राष्ट्रवादी
कामठी - चंद्रशेखर बावनकुळे, भाजप
रामटेक - अपक्ष, चुरशीची लढत
अहेरी - धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी
भोकर - श्रीजया चव्हाण, भाजप
कन्नड - उदयसिंग राजपूत, चुरशीची लढत
पू. औरंगाबाद - इम्तियाज जलील, चुरशीची लढत
सिल्लोड - अब्दुल सत्तार, शिवसेना
येवला - छगन भुजबळ, राष्ट्रवादी
दिंडोरी - सुनीता चारोसकर, राष्ट्रवादी (शरद पवार)
बेलापूर - संदीप नाईक, राष्ट्रवादी (शरद पवार)
जोगेश्वरी पूर्व - अनंत नर, शिवसेना ठाकरे गट
वर्सोवा - हारुन खान, शिवसेना
अंधेरी पूर्व - मुरजी पटेल, भाजप
शिवडी - अजय चौधरी, शिवसेना ठाकरे गट
मुंबादेवी - अमीन पटेल, काँग्रेस
महाड - स्नेहल जगताप, शिवसेना ठाकरे गट
दापोली - संजय कदम, शिवसेना ठाकरे गट
उ. कोल्हापूर - राजेश क्षीरसागर, शिवसेना
कागल - हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
तासगाव - रोहित पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)
जत - विक्रमसिंह सावंत, काँग्रेस
द. सोलापूर - सुभाष देशमुख, भाजप
माळशिरस - उत्तम जानकर, राष्ट्रवादी (शरद पवार)
सांगोला - बाबासाहेब देशमुख, शेकाप
कोरेगाव - शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार)
माढा - अभिजीत पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)
वाई - मकरंद पाटील, राष्ट्रवादी
पलूस कडेगाव - राष्ट्रवादी
इस्लामपूर - जयंत पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)
मिरज - सुरेश खाडे, भाजप

 

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget