Maharashtra Cabinet Expansion: विधानसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आज (15 डिसेंबर) महायुती सरकारमधील नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.दरम्यान, राजकीय घडामोडींना वेग आलाय. गेल्या दोन दिवसांपासून मंत्रीपदासाठी आमदारांची लॉबिंग सुरु असल्याची चर्चा होती. वर्षा, सागर बंगल्यावर शिंदेगटाच्या आमदारांची वर्दळ होती. आता शपथविधीच्या दिवशी शिंदे गटाची टीम फायनल होत आली आहे. मंत्रिपदासाठी शिंदेगटाकडून काही आमदारांना फोन गेले आहेत. यात कोणाचा नंबर लागला? अन् कोणाचा पत्ता कट झाला? पाहूया संभाव्य मंत्र्यांची नावं..
महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांना संबंधित पक्षाचे वरिष्ठांचे फोन जाण्यास सुरुवात झाली आहे. याचदरम्यान आज भाजपसह शिवसेना शिंदे गटाची यादी समोर आली आहे.शिवसेनेत 5 जुने मंत्री आणि 7 नवीन आमदारांना म्हणजे एकुण 12 जणांना संधी मिळणार आहे.(BJP Shivsena NCP Minister List 2024)
या आमदारांना गेले शिंदेगटाकडून फोन
1. उदय सांमत
2. प्रताप सरनाईक
3. शंभूराज देसाई
4. योगश कदम
5. आशिष जैस्वाल
6. भरत गोगावले
7. प्रकाश आबिटकर
8. दादा भूसे
9. गुलाबराव पाटील
10. संजय राठोड
11. संजय शिरसाट
पाच जुन्या मंत्र्यांना मिळणार पुन्हा संधी
1. उदय सामंत, कोकण
2. शंभुराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र
3. गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र
4. दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र
5. संजय राठोड, विदर्भ
या नेत्यांचा पत्ता कट?
शिवसेना शिंदे गटाकडून यंदा कॅबिनेट मंत्रीपदी या आमदारांना पुन्हा संधी नसल्याची शक्यता आहे.
1. दीपक केसरकर
2. तानाजी सावंत
3. अब्दुल सत्तार
शिंदेगटाची मंत्रिपदाची यादी ठरली
भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या मंत्रिपदासाठीच्या आमदारांची यादी फिक्स झाली असून आपापल्या पक्षाकडून संभाव्य आमदारांना फोन जात आहेत.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेगटाच्या संभाव्य मंत्र्यांची नाव फिक्स झाली असून १२ आमदारांना शिंदे गटाकडून फोन गेले आहेत.
मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री
मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या राजभवनात दुपारी तीननंतर हा शपथविधी होणार असून राजभवनाच्या प्रशस्त लॉनवर याची जोरदार तयारी करण्यात आलीय. याआधी 1991 मध्ये शिवसेनेतल्या फुटीनंतर नागपुरात शपथविधी झाला होता .यानंतर 33 वर्षांनंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी हा नागपुरात होणार आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरात
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे आज पहिल्यांदा नागपूर मध्ये आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठ भाग पूर्णता भगवामय झाल्याचे पाहायला मिळत आहे.