Maharashtra Cabinet Expansion Live Updates : महायुती सरकारचा नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार, एकूण 33 कॅबिनेट मंत्र्यांनी तर 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ
Devendra Fadnavis Cabinet Expansion Today Live Updates : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आहे. आता महायुतीपुढे नाराजांना संतुष्ट करण्याचे आव्हान असणार आहे.
प्रज्वल ढगेLast Updated: 15 Dec 2024 08:30 PM

पार्श्वभूमी
Maharashtra Government Cabinet Expansion Live Updates : राज्य मंत्रिमंडळाचा आज (15 डिसेंबर) विस्तार झाला आहे. नागपुरातील राजभवनात हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात 33 नेत्यांनी मंत्रिपदाची तर 6...More
Maharashtra Government Cabinet Expansion Live Updates : राज्य मंत्रिमंडळाचा आज (15 डिसेंबर) विस्तार झाला आहे. नागपुरातील राजभवनात हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात 33 नेत्यांनी मंत्रिपदाची तर 6 नेत्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिपद मिळावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेते पूर्ण ताकदीने प्रयत्न करत होते. शेवटी आता मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून नाराजांना संतुष्ट करण्याचे आव्हान महायुतीच्या घटकपक्षाच्या प्रमुख नेत्यांपुढे असणार आहे.कोणी कोणी घेतली मंत्रिपदाची शपथदेवेंद्र फडणवीस : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे : उपमुख्यमंत्रीअजित पवार : उपमुख्यमंत्रीकॅबिनेट मंत्री1.चंद्रशेखर बावनकुळे2.राधाकृष्ण विखे पाटील3.हसन मुश्रीफ4.चंद्रकांत पाटील5.गिरीश महाजन6.गुलाबराव पाटील7.गणेश नाईक8.दादाजी भुसे9.संजय राठोड10.धनंजय मुंडे 11.मंगलप्रभात लोढा12.उदय सामंत13.जयकुमार रावल14.पंकजा मुंडे15.अतुल सावे16.अशोक उईके17.शंभूराज देसाई18. आशिष शेलार19.दत्तात्रय भरणे20.अदिती तटकरे21.शिवेंद्रराजे भोसले22.माणिकराव कोकाटे23.जयकुमार गोरे24.नरहरी झिरवाळ25.संजय सावकारे26.संजय शिरसाट27.प्रताप सरनाईक28.भरत गोगावले29.मकरंद पाटील30.नितेश राणे31.आकाश फुंडकर32.बाबासाहेब पाटील33.प्रकाश आबिटकर---------------------------------------एकूण 36 कॅबिनेट मंत्रीराज्यमंत्रिपदाची शपथ घेणारे नेते1) माधुरी मिसाळ2) आशिष जैस्वाल3) पंकज भोयर4) मेघना बोर्डीकर साकोरे5) इंद्रनील नाईक6) योगेश कदममहाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024 (Maharashtra Assembly party wise seats)महायुती- 237मविआ- 49अपक्ष/इतर - 02---------------------एकूण - 288महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing)भाजपा- 132शिवसेना (शिंदे गट)- 57राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41काँग्रेस- 16राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10शिवसेना (ठाकरे गट)- 20समाजवादी पार्टी- 2जन सुराज्य शक्ती- 2राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1एमआयएम- 1 जागासीपीआय (एम)- 1पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 अपक्ष- 2भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्षजनसुराज्य शक्ती - 2युवा स्वाभिमान -1रासप- 1अपक्ष - 1 (शिवाजी पाटील- चंदगड)भाजपचं एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137
Devendra Fadnavis : सर्व मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन करणार : देवेंद्र फडणवीस
सर्व मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. खातेवाटपाबाबत सहमती झाली आहे. पालकमंत्रिपदाबाबत अजून बैठक झालेली नाही. दोन तीन दिवसात त्याचा निर्णय होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.