एक्स्प्लोर

पोलिसांच्या वाहनातून महायुतीच्या उमेदवारांना रसद..., काल शरद पवार तर आज अजितदादांचा पोलिसांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवार यांनी पोलीस दलाच्या वाहनातून निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात असल्याचा आरोप केला. या पाठोपाठ अजित पवार यांनी पोलिसांवर आरोप केलाय. 

बारामती : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पोलीस दलाच्या वाहनातून निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात असल्याचा गंभीर आरोप केला. या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पोलिसांवरच आरोप केलाय. 

अजित पवार आज बारामती तालुक्यात गावभेट दौरा करीत आहेत. शिर्सुफळ गावातील नागरिकांशी बोलताना अजित पवारांनी पोलिसांवर आरोप केलाय. अजित पवार म्हणाले की, सोयाबीनचा दर वाढला की तेलाच्या किंमती वाढतात. बारामतीत मी गुन्हेगारी वाढवू दिली नाही. ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी मला चिठ्ठ्या येतात. दादा दारू भट्टी बंद करा. दारूचे धंदे बंद झाले तर बहिणी तुम्हाला आशीर्वाद देतील. बारामती पोलिसांचा स्टाफ बदला. गरीबाचे काम करत नाही. बारामतीचे पोलीस गरिबांची काम करत नाहीत पैसे घेऊन शांत बसतात, असे सांगितले जाते. आचारसंहिता संपल्यावर संबंधितांना सांगतो. मी पहाटेच कामे बघायला जातो तिथं गेल्यानंतर सकाळी लवकर येतो आणि बघतो. जर कोण दिसेल त्या पोलिसाला सस्पेंड करतो. पोलिसांना हप्ते जातात त्यामुळे पोलीस कारवाई करत नाहीत, असा आरोप अजित पवार यांनी केलाय. पोलिसांना आम्ही 25 कोटी गाड्या घ्यायला दिले. पोलीस हप्ते घेतात आणि त्यातलं काही हप्ता मला येतोय असेही काही नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. 

आता माझा विचार करा : अजित पवार 

अजित पवार पुढे म्हणाले की, लोकसभेला तुम्ही साहेबांचा विचार केला आता माझा विचार करा. 23 वर्ष साहेब तुमचे आमदार होते मी 33 वर्षे झाले तुमचा आमदार आहे. जानाई शिरसाई योजना मी पद्मसिंह पाटील हे मंत्री असताना मंजूर करून घेतली. पुरंदर उपसा सिंचन योजना दादासाहेब जाधवराव यांना विचारा कोणी मंजूर केली. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. कामे आकाशात पडणार नाहीत ना? कुणीतरी ठेकेदार पाहिजे ना? काम खराब झालं तर सांगा ना. पण  असे बोललं की वाईट वाटत. कामे कुणाला तरी द्यावी लागतील ना? उगाच मलिदा मलिदा म्हणायचं.  वाईट वाटून घेऊ नका. रेल्वेचे काम खासदाराकडे असतं. त्यामुळे ते काम त्यांना सांगा. ज्याचं काम त्याला सांगा. खासदाराला तुम्ही निवडून दिल आहे. सुनेत्राला वरून बसवलं आहे. मी राज्यात काम करतो. अस म्हणताच एकच हशा पिकाला. गंमतीचा भाग सोडा पण एक पत्र सुप्रियाला द्या, एक सुनेत्राला द्या, असेही त्यांनी म्हटलं आहे. 

आणखी वाचा 

Pune Crime: दिवाळीत नकली पिस्तूल दाखवून पसरवली दहशत; दोघांना पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget