मोठी बातमी! नानाभाऊ महाराष्ट्रामध्ये काय बनणार हे तुम्हाला माहित, मुख्यमंत्री पदासाठी नाना पटोलेंचा अप्रत्यक्ष होकार
Nana Patole : नाना पटोले यांनी आमगाव येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये भाषणादरम्यान मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्ष होकार दिला आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात.
Nana Patole : विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) मैदान चांगलाच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. अशातच निवडणुककीच्या आधीच महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री (Maharashtra Chief minister) कोण होणार? याची जोरदार चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीतून अनेक नावांची चर्चा सुरु आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्ययक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं. नाना पटोले यांनी आमगाव येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये भाषणादरम्यान मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्ष होकार दिला आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात.
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये नाना पटोले यांचं नाव नेहमीच बघायला मिळते. या संदर्भात नाना पटोले यांनी आज आमगाव येथे आयोजित सभेमध्ये भाषणादरम्या मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्ष होकार दिला आहे. आमगाव-देवरी विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार राजकुमार पुराम यांच्या प्रचारासाठी नाना पटोले आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राजकुमार पुराम याला आमदार बनवायचे आहे. नाही बनवलं तुम्ही तर महाराष्ट्रात नानाभाऊ उद्या काय बनणार आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही एक एक आमदार नाही दिले तर अडचण येणार आहे असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं आहे. त्यामुळं नाना पटोले यांनी एक प्रकारे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पदासाठी होकार दिला आहे. गरिबारांचा आणि शेतकऱ्यांचं सरकार पाहिजे तर तुम्हाला राजकुमार पुरामला निवडून द्यावाच लागणार आहे असे नाना पटोले म्हणाले.
राजकुमार पुरामला आमदार बनवावं लागेल, नाहीतर अडचण येईल
राजकुमार पुरामला आमदार बनवावं लागेल. तुम्ही एक एक आमदार नाही दिलेत तर अडचण येमार आहे. कारण पुढे मी महाराष्ट्रात काय बनणार आहे हे तुम्हाला माहबित असल्याचे नाना पटोले म्हणाले. शेतकऱ्यांचे गरिबांचे सरकार आणायचे असेल तर पुरामला निवडून आणावं लागेल असे पटोले म्हणाले. ही वेळ आपल्या आत्मसन्मानाची आहे. मोठ्या परिश्रमाने मी इठपर्यंत आलो असल्याचे नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रात परिवत्रन होणार आहे, या परिवर्तनात राजकुमार पुरामला विधानसभेत पाठवा असे आवाहन पटोले यांनी केलं. दरम्यान, नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदासाठी ते इच्छुक असल्याचे बोलले जात आ
महत्वाच्या बातम्या:
ज्यांच्या डोक्यावर केस नाही तेही आता डोक्यावरून कंगवा फिरवताय; नितीन गडकरींच्या टीकेला नाना पटोलेंचे प्रत्युत्तर, म्हणाले....