एक्स्प्लोर

Maharashtra Vidhansabha election 2024: मुर्तीजापूरमध्ये तिकिटासाठी भाजपमध्ये धुसफुस वाढली , हरीश पिंपळेचं तिकीट कापत नव्या चेहऱ्याला संधी?

पक्षाने हरीश पिंपळेंना उमेदवारी दिली नाही तर मतदारसंघातील बुथ प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकारी मिळून एकाच वेळी राजीनामा देणार असल्याचा इशारा देत संतप्त कार्यकर्ते एक आले होते.

Maharashtra Vidhansabha Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर राजकीय घटनांना वेग आला आहे. बहुतांश पक्षांच्या आता उमेदवारांच्या पहिल्या याद्या आल्या आहेत. अनेकांनी दुसऱ्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अकोल्यातील मुर्तिजापूरात भाजपमध्ये असंतोष उफाळून आलाय. निमित्त आहे उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्याने आमदार हरीश पि़पळेंच्या तिकिट कापल्याच्या चर्चेचं.  मुर्तिजापूरच्या भाजप आमदार हरीश पिंपळे यांचं तिकीट कापलं जाणार अशा भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्याऐवजी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या रवी राठींना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याविरोधात मुर्तिपूरात भाजपमध्ये असंतोष उफाळून आला आहे. पक्षाने हरीश पिंपळेंना उमेदवारी दिली नाही तर मतदारसंघातील बुथ प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकारी मिळून एकाच वेळी राजीनामा देणार असल्याचा इशारा देत संतप्त कार्यकर्ते एक आले होते.

नक्की झाले काय?

शनिवारी रात्री हरीश पिंपळेंच्या मुर्तिजापूर येथील लकडगंज भागातील घरासमोर मतदार संघातील भाजपचे शेकडो संतप्त कार्यकर्ते एकत्र आलेत. पक्षाने हरीश पिंपळेंना भाजपने उमेदवारी दिली नाही तर मतदारसंघातले 390 बुथ प्रमुख, शाखाप्रमुख पदाधिकारी एकाचवेळी राजीनामा देणार असल्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय. यावेळी हरीश पिंपळे यांच्या समर्थनात मूर्तिजापूर मतदारसंघातले पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांनी घोषणाबाजी केलीय.. मुर्तीजापुर मतदारसंघात आयात केलेला उमेदवार नको. बाहेरील उमेदवाराला संधी दिल्यास, आपण पक्षाचे काम करणार नाही आणि राजीनामा देणार, असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिलाय... 

नव्या चेहऱ्याला देणार संधी?

मुर्तिजापूर मतदारसंघात रवी राठींऐवजी शरद पवार गटाने सम्राट डोंगरदिवेंना उमेदवारी़ दिली आहे.. त्यामूळे रवी राठी नाराज होते. त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली होती. आणि भाजपची वाट धरली आहे. 2019 मध्ये रवी राठींनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर मुर्तीजापुरमधून 42 हजार मते घेतली होती. महायुतीत मुर्तीजापुर मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळं भाजप मुर्तीजापूरमधून विद्यमान आमदार हरीश पिंपळे ऐवजी आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता असल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यातील एकमेव राखीव असलेला विधानसभेचा एकमेव  मतदारसंघ म्हणजे मुर्तीजापूर....मुर्तीजापूर अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महाराष्ट्र निर्मितीनंतर एक अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देणारा मतदारसंघ

मुर्तिजापूर मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते 

भाजपाचे हरीश पिंपळे 1,910 मतांनी विजयी

उमेदवार                   पक्ष             मते 
हरिश पिंपळे             भाजप       59527
प्रतिभा अवचार          वंचित        57617
रविकुमार राठी          राष्ट्रवादी      41155

हेही वाचा:

Murtijapur Assembly Election 2024 : मुर्तिजापुरमध्ये वंचितकडून डॉ. सुगत वाघमारे रिंगणात; भाजप, राष्ट्रवादीचा तिढा सुटेना, कोण मारणार बाजी?

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget