एक्स्प्लोर

कोंबड्या चोरांना बर्फाच्या लादीवर झोपवणार, 23 तारखेला बटली गँगचा माज उतरवणार, आदित्य ठाकरेंचा राणेंवर प्रहार

आमच्या वर टीका करण्यासाठी गेली 10 वर्ष पगार घेणारी बटली गँग राजकोट किल्ल्यावर माज दाखवत होते असे म्हणत आदित्य ठाकरेंनी नारायण राणे यांच्यावर टीका केली.

Aditya Thackeray on Narayan Rane : आमच्या वर टीका करण्यासाठी गेली 10 वर्ष पगार घेणारी बटली गँग राजकोट किल्ल्यावर माज दाखवत होते. येत्या 23 तारखेला यांचा माज उतवणार असल्याचे म्हणत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) भाजप खासदार नारायण राणेंवर (Narayan Rane) टीका केली. कोंबड्या चोरांना बर्फाच्या लादिवर झोपणार, असा टोलाही त्यांनी राणेंना लगावला. हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार आहेत. आपल्यात वाद निर्माण करुन बटेंगे तो कटेगे नारा देत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे माणगावमध्ये आले होते, त्यावेळी बोलत होते. 

उद्या मंत्रालय देखील गुजरातमध्ये न्याल

गेल्या दोन महिन्यात एक फसवी योजना आणली आहे. लाडकी बहीण योजना. त्यांची घोषणा होती 15 लाख रुपे देण्याची पण त्यांनी 2024 ला 1500 देतायेत, ते निर्लज्ज लोकं आहेत असे म्हणत भाजपवर जोरदार टीका केली. झाशीत एवढी दुर्घटना घडली तरी त्यांनी आपला एकही कार्यक्रम रद्द केला नाही.उद्या मंत्रालय देखील गुजरातमध्ये न्याल, त्यामुळे परिवर्तन करावं लागेल असे आदित्य ठाकरे म्हणाले. भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यावर देखीवल त्यांनी टीका केली. महाडिक आमचं सरकार येतंय, आम्ही बघा तुमचं काय करतो ते असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 

वैभव नाईक निवडून येणार, सत्ताधारी पक्षाचे आमदार होणार

येणारी निवडून आपल्याला साधी सोपी वाटली, तरी सोपी नाही. वैभव नाईक निवडून येणार, सत्ताधारी पक्षाचे आमदार होणार असा विश्वास देखील आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. वैभव नाईक यांच्यावर धमक्या, दबाव होता असेही  आदित्य ठाकरे म्हणाले. गेल्या दोन वर्षांत आपली लढाई सुरू आहे, दोन वर्षात पक्ष नेला, आजोबांचे फोटो चोरल्याचे  आदित्य ठाकरे म्हणाले. गुजरातमध्ये मोदींनी रोड शो काढला, कारण महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात मध्ये नेले. उध्दव ठाकरे यांच्यावर उद्योगपतीचा विश्वास आहे, आता सरकार पुन्हा आलं की उद्योग राज्यात येतील असेही  आदित्य ठाकरे म्हणाले. 

 उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राणेंच्या मनात एवढा राग का?

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा घोटाळा का केला? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराजांबद्दल यांच्या मनात द्वेष का? असेही ते म्हणाले.  आज आजोबांची पुण्यतिथी आहे. आज राणेंनी जे दुःख दिलं, आमच्यावर अतिशय वाईट टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मनात एवढा राग का? राणेंच्या मेडिकल कॉलेजला एका मिनिटात सही केली. आमच्या कठीण काळात काँगेस आणि राहुल गांधी आमच्या सोबत उभे आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget