एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election 2019 | मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेचा पराभव, काँग्रेसचे झिशान सिद्दीकी विजयी

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा 4285 मतांनी पराभव झाला आहे.

मुंबई : मातोश्रींच्या अंगणातचं शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पराभवचा सामना करावा लागला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी विजयी झाले आहेत. शिवसेनेचे विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेला या पराभवाला सामोरे जावं लागलं असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरीमुळे शिवसेनेला पराभव पत्करावा लागला आहे. वांद्रे पूर्वचे विजयी आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आहे. शिवसेनेने विद्यमान आमदार अशोक पाटील आणि तृप्ती सावंत यांना डावलून विश्वनाथ महाडेश्वरांना तिकीट दिली होती. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या झिशान सिद्दीकी यांना 37,636 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वरांना 23,069 मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्या पराभवामागचं मुख्य कारण म्हणजे शिवसेच्या बडखोर तृप्ती सावंत यांना 23,856 मतं मिळाली. तर मनसेच्या अखिल चित्रे यांना 10,403 मतं मिळाली. दरम्यान शिवसेनेचे विद्यमान तृप्ती सावंत यांनी उमेदवारी नाकारल्या नंतर या समर्थकांसह मातोश्रीबाहेर रात्री ठिय्या मांडला होता. तृप्ती सावंत यांच्या जागेवर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात होती. या आंदोलनानंतर पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड देखील करण्यात आली होती. त्यानंतर काही शिवसेनेकडून तृप्ती सावंत यांना बेदखल करण्यात आलं होतं. BJP Candidates | वांद्रे पूर्वमधून विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी, तृप्ती सावंत यांचा पत्ता कट केल्यानंतर समर्थक नाराज | ABP Majha दरम्यान हा मतदारसंघ गेल्या 2014 च्या निवडणुकीत सर्वांत जास्त चर्चेत राहिला. यावेळी प्रकाश उर्फ बाळा सावंत हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. मात्र, 2015 मध्ये त्यांचं निधन झालं. या पार्श्वभूमीवर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नारायण राणेंचा त्यांनी 20 हजार मतांनी पराभव केला होता. या पोटनिवडणुकीत थेट मातोश्रीच्या अंगणातला गड जिंकण्यासाठी काँग्रेसकडून नारायण राणे शड्डू ठोकून उभे राहिले खरे. मात्र, नारायण राणेंना शिवसेनेनं मातोश्रीच्या अंगणातच आस्मान दाखवलं आणि त्यांच्या राजकिय कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांचा शिवसेनेकडून पोटनिवडणुकीत विजय झाल्यानंतर शिवसैनिकांनी केलेला जल्लोष आणि नारायण राणेंची उडवलेली खिल्ली कुणालाही विसरता येणार नाही. VIDEO | महापौर विश्वनाथ महाडेश्वरांची अरेरावी, महिलेचा हात पिरगळला | मुंबई | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget