एक्स्प्लोर

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ | मंत्री जयकुमार रावल यंदा हॅटट्रिक करणार?

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची 2009 मध्ये फेररचना झाली. ही फेररचना कदाचित भाजपचे विद्यमान आमदार तथा मंत्री जयकुमार रावल यांना लकी ठरली. 2009 पासून ते आजतागायत जयकुमार रावल हेच शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जयकुमार रावल यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने मतदारसंघासाठी एव्हाना संपूर्ण धुळे जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

धुळे : रोजगार हमी, पर्यटन विकास, अन्न औषध विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांचा शिंदखेडा मतदारसंघ. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात गडी आणि मढी ही या मतदारसंघाची राजकारणाची केंद्र. दोन कट्टर विरोधकांचा वाढदिवस एकाच दिवशी असणारा हा मतदारसंघ . या मतदारसंघात आघाडीच्या काळात डॉ. हेमंत देशमुख यांना मंत्रिपद मिळालं होतं तर युतीच्या काळात जयकुमार रावल यांना मंत्रिपद मिळालेलं आहे. मात्र तालुक्याला दोन वेळा मंत्रिपद मिळूनही शिंदखेडा मतदारसंघातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात फारसं यश आलं नसल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातील औष्णिक वीज प्रकल्प, सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या समस्या हे या मतदारसंघातील मुख्य समस्या. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात 162 गावांचा समावेश होतो. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची 2009 मध्ये फेररचना झाली. धुळे लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात हा मतदारसंघ येतो. पूर्वी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा आणि नंदुबार जिल्ह्यातील शहादा असा मतदारसंघ होता. या शहादा-दोंडाईचा मतदारसंघात 54 गावांचा समावेश होता तर शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात सोनगीर सर्कलमधील काही गावांचा समावेश होता. मतदारसंघाच्या फेररचनेनंतर शहादा-दोंडाईचा असा मतदारसंघ न राहता आता फक्त शिंदखेडा मतदारसंघ आहे. ही फेररचना कदाचित भाजपचे विद्यमान आमदार तथा मंत्री जयकुमार रावल यांना लकी ठरली. 2009 पासून ते आजतागायत जयकुमार रावल हेच शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जयकुमार रावल यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने मतदारसंघासाठी एव्हाना संपूर्ण धुळे जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात 2009 मध्ये जयकुमार रावल यांनी एंट्री करत आघाडीला धक्का दिला. पुढे 2014 मध्ये रावल यांनी आपले कट्टर विरोधक हेमंत देशमुख यांचा पराभव केला. 2014 मध्ये राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांचा देखील रावल यांनी पराभव केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत  कोणाला किती मतं? 1. जयकुमार रावल (भाजप) -  92 हजार 764 2. संदीप बेडसे  (राष्ट्रवादी काँग्रेस) - 50 हजार 636 3. श्यामकांत सनेर (काँग्रेस) - 48 हजार 25 4. राजेंद्रसिंग गिरासे (शिवसेना) - 2 हजार 263 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून कोणाला किती मतं? 1. डॉ . सुभाष भामरे (भाजप) - 1 लाख 13 हजार 667 2. कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस) -60 हजार 78 शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील मतदार संख्या पुरुष मतदार - 1 लाख 61 हजार 518 स्त्री मतदार - 1 लाख 55 हजार 440 यंदाच्या निवडणुकीत यांची नांव चर्चेत - 2014 ची विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढल्याने आघाडी आणि युतीला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आघाडी आणि युती असली तरी काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, जुही देशमुख, ज्ञानेश्वर भामरे, राष्ट्रवादीतर्फे संदीप बेडसे, शिवसेनेतर्फे हेमंत साळुंखे, शानभाऊ सोनवणे यांची नांव चर्चेत आहेत. भाजपतर्फे विद्यमान आमदार जयकुमार रावल यांनाच उमेदवारी आहे. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे जयकुमार रावल यांची हॅटट्रिक होण्यासाठी, इथे झालेली आणि प्रस्तावित असलेली काही कामं पुरेशी बोलकी असल्याचं भाजपचे कार्यकर्ते सांगतात. त्यात प्रामुख्याने :- 1. शिंदखेडा शहराचा, दोंडाईचा शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न रावल यांनी मार्गी लावला. 2. दोंडाईचा येथे अपर तहसील कार्यालय कार्यान्वित केलं. 3. सुलवाडे-जामफळ सिंचन योजना 4. शिंदखेडा तालुक्यात रोजगार हमीच्या माध्यमातून तब्बल 5 हजार विहिरी खोदण्यात आल्या. 5. तापी काठावरील 22 उपसा योजना 6. बुराई नदी बारमाही योजना . उपरोक्त कामं जयकुमार रावल यांच्यासाठी 2019 च्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी पुरेशी ठरतील आणि जयकुमार रावल हॅटट्रिक करतील असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. यंदाच्या निवडणुकीत युवा वर्गाची भूमिका महत्त्वाची असल्याने शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील युवक कोणाला कौल देतात हे मतदानाच्या दिवशी स्पष्ट होईल .

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Embed widget