एक्स्प्लोर

गोव्यात लोकसभेसाठी 74.72 तर विधानसभा पोटनिवडणुकांसाठी 78.77 टक्के मतदान

महाराष्ट्रासह गोव्यात देखील काल लोकसभेच्या दोन तर तीन विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी सरासरी 74.72 टक्के तर तीन विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सरासरी 78.77 टक्के मतदान झाले.

पणजी : लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. महाराष्ट्रासह गोव्यात देखील काल लोकसभेच्या दोन तर तीन विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी सरासरी 74.72 टक्के तर तीन विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सरासरी 78.77 टक्के मतदान झाले. उत्तर गोवा लोकसभेसाठी 76.0 तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात 72.89 टक्के मतदान झाले. विधानसभा पोटनिवडणुकांसाठी मांद्रे मतदारसंघात 81.61, शिरोडयात 80.09 तर म्हापसा येथे 75.17 टक्के मतदारांनी मतदानाच हक्क बजावला. गोव्यात सरासरी 78.77 टक्के मतदान झाले. 2014 मध्ये लोकसभेसाठी राज्यात सरासरी 76.86 टक्के एवढे मतदान झाले होते. त्याच्याशी तुलना केल्यास 2019 च्या या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सरासरी कमी झाली आहे. मांद्रे मतदारसंघात 2017 मध्ये 87.40 टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत तेथील टक्केवारी घसरली असून ती 81.61 वर आली. शिरोड्यात 2017 मध्ये 85.78 टक्के इतके मतदान झाले होते. तर आता तेथील टक्केवारी घसरुन 80.09 वर पोहोचली. म्हापसा येथे 2014 मध्ये 87.34 टक्के मतदान झाले होते तेथेही आता मतदानाची टक्केवारी 75.17 एवढी खाली आली. तिन्ही पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी 2017 च्या तुनलनेत बरीच खाली आल्याचे स्पष्ट झाले आहे.  लोकसभेसाठी 80 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.  मात्र अपेक्षित वाढ न होता मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. लोकसभा मतदानासाठी विविध मतदान केंद्रात मिळून 10 बीयू (बॅलट युनिट), 10 सीयू (कंट्रोल युनिट), आणि 29 व्हीव्हीपीटी मशीन (यंत्रे) बदलण्यात आली.  पोटनिवडणुकीसाठी मात्र एकही बीयू, सीयू बदलण्यात आले नाही तथापी 2 व्हीव्हीपीटी यंत्रे बदलण्यात आली. मतदानासाठी वापरण्यात आलेली सर्व यंत्रे (ईव्हीएम) सरकारी पॉलिटेक्निक (पणजी), आणि मल्टी पर्पज हॉल (मडगाव) येथे ठेवण्यात आली असून त्याला सीसीटीव्ही कॅमेरासह दुहेरी सुरक्षा 24 तास पुरवण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget