Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 13 खासदारांसह काँग्रेस राज्यात आणि महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सांगलीत विशाल पाटील यांच्या विजयामुळे काँग्रेसचे संख्याबळ 14 वर पोहोचणार आहे. महाविकास आघाडीत आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत येणार असल्याची चिन्हे आहेत. शिवाय, लोकसभेच्या या निकालामुळे विधानसभेला महाविकास आघाडीतील गणिते बदलणार असणार असल्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसचे विजयी उमेदवार कोणते?
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत 17 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 13 जागांवर काँग्रेसने विजय मिळवलाय. काँग्रेसचे कोण कोणते उमेदवार विजयी झाले? जाणून घेऊयात...
सोलापूर प्रणिती शिंदे विजयी
कोल्हापूर शाहू महाराज विजयी
चंद्रपूर प्रतिभा धानोरकर विजयी
गडचिरोली चिमूर नामदेव किरसान विजयी
नांदेड वसंतराव चव्हाण विजयी
उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड विजयी
रामटेक श्यामकुमार बर्वे विजयी
नंदूरबार गोवाल पाडवी विजयी
लातूर शिवाजीराव काळगे विजयी
धुळे शोभा बच्छाव विजयी
भंडारा गोंदिया प्रशांत पडोळे विजयी
अमरावती बळवंत वानखेडे विजयी
जालना कल्याण काळे विजयी
महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने 17 जागा लढवल्या होत्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागांवर शड्डू ठोकला होता. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 21 जागा लढवल्या होत्या. दरम्यान, शरद पवारांची राष्ट्रवादीने सध्या 8 जागांवर आघाडी घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या